निमगाव म्हाळुंगीच्या प्राचीन महादेव मंदिराचा झाला जीर्णोद्धार
( प्रतिनिधी ) निमगाव म्हाळुंगी ता. शिरुर येथील महादेव पठार येथे असलेल्या प्राचीन महादेव मंदिराचा नुकताच ग्रामस्थांच्या माध्यमातून जीर्णोद्धार करण्यात आला असून आता नवीन मंदिराचा विधी पूर्ण करुन मंदिर ग्रामस्थांसाठी खुले करण्यात आल्याचे सरपंच बापुसाहेब काळे यांनी सागितले.
निमगाव म्हाळुंगी ता. शिरुर येथील महादेव पठार येथे प्राचीन महादेव मंदिर असून स्व. सयाभाऊ चौधरी व स्व. रोहिदास चौधरी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांनी मंदिर बांधकामासाठी जागा दिल्याने ग्रामस्थांच्या माध्यमातून मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेत सप्टेंबर २०२१ मध्ये भूमीपूजन करण्यात आले होते, नुकतेच मंदिराचे काम पूर्ण होऊन ग्रामस्थ व देणगीदारांच्या माध्यमातून भव्यदिव्य महादेव मंदिर उभे राहिले, नुकतेच सरपंच बापूसाहेब काळे यांच्या हस्ते पूजेला प्रारंभ करून ह.भ.प. भागवताचार्य कृष्णा महाराज नागे यांच्या उपस्थितीत माऊली महाराज पजई, गजानन महाराज इंगवले, कुंडलीक महाराज मीरासे, शंकर महाराज इंगवले, परशुराम चौधरी, दशरथ गोसावी यांच्या माध्यमातून कीर्तन पार पडले, याप्रसंगी माजी आमदार सूर्यकांत पलांडे, वडगाव शेरीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, माजी सभापती सीताबाई रणसिंग, विजय रणसिंग, सुनिल वडघुले, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव जयेश शिंदे, शांताराम कटके, शिवाजी वडघुले, रामचंद्र शिवले, सतीश भुजबळ, म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुदाम चव्हाण, बबनराव रणदिवे, हनुमंत काळे, आकाश वडघुले, दादासाहेब रणसिंग यांसह आदी मान्यवर उपस्थित होते, यावेळी सरपंच बापूसाहेब काळे यांनी मंदिरासाठी जागा व देणगी देणाऱ्यांबाबत कृतज्ञता व्यक्त करत सर्वांचे आभार मानले.
फोटो खालील ओळ – निमगाव म्हाळुंगी ता. शिरुर येथे प्राचीन महादेव मंदिर जीर्णोद्धार पूजन प्रसंगी मान्यवर व ग्रामस्थ.