शिरूर प्रतिनीधी
शिरूर जवळील बाबुराव नगर येथील महिंद्रा हाईट येथे ते दोघे स्विफ्ट डिझायर कार मधून आले आणि जाताना इर्टिगा कार चोरून घेऊन गेले अशा प्रकारे हाय प्रोफाईल चोरट्यांनी चोरी केली असून त्या अज्ञान दोघा चोरट्यांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
योगेश आनंदा गुंड (वय ४७ वर्षे धंदा-नोकरी रा गंगा पेट्रोलपंपाच्या पाठीमागे महेंद्र हाईट्स बाबुरावनगर शिरूर ता शिरूर ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक 25 ऑगस्ट पहाटे चार वाजता बाबुराव नगर येथील महिंद्रा हाईट्स या बिल्डिंगच्या बाजूला रोडच्या कडेला लॉक करून पार्किंग करून ठेवलेली मारुती सुझुकी कंपनीची इर्टिगा कार क्रमांक MH 12 TD/ 0702 स्विफ्ट डिझायर कार मधून आलेल्या दोघा चोरट्यांनी इर्टिगा कारचे लॉक तोडून कार चोरून नेली आहे.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे वाहन चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिरम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप करीत आहे.