सावधान... तर्डोबावाडी जवळील बगाड रस्त्यावर तसेच जांभळीमळा येथे बिबट्याचा वावर या भागात फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी...

9 Star News
0
शिरूर प्रतिनीधी 
सावधान..... बिबट्या आलाय.. शिरूर बाबुराव नगर पुढील तर्डोबावाडी बगाड रस्त्यावर जांभळी मळा परिसरात फिरायला जाताय गेल्या काही दिवसां पासून या भागात बिबट्या वावर असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे. या भागात शिरूर शहरातून रात्री व पाठी मॉर्निंग साठी येणाऱ्या महिला व वृद्ध नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
         बगाड तरडोबावाडी रस्त्यावर काल रात्री एक बिबट्या रस्ता ओलांडून अंधारात जाताना चा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामुळे या परिसरात असलेली नवीन झालेली वस्ती तसेच सुंदर सृष्टी गोरे मळा आंबेकर मळा व थापे मळा या परिसरातील नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे. 
        या बिबट्याचा व्हिडिओ नक्की कोणी काढला याबाबत माहिती मिळाली नसली तरी बिबट्या आहे हे रात्री कळाले असून याबाबत स्थानिकांनी हा व्हिडिओ काढला असेल तर्डोबावाडी ग्रामपंचायत वन विभागाला कळवले आणि या भागाची पाहणी केली आहे.
         शिरूर शहर बाबुराव नगर परिसरातील मोठ्या प्रमाणात महिला पुरुष लहान मुले या भागात मॉर्निंग ॉक रनिंग करण्यासाठी जात असतात. पहाटेपासूनच हा रस्ता फिरण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे गजबजून गेलेला असतो. त्त्यात रात्री बिबट्या दिसल्याने या भागात फिरायला येणाऱ्या नागरिकांना स्वतःची सुरक्षा व सावधानता बाळगणे गरजेचे आहे. 
         या परिसरात बिबट्या आढळला असला तरी अद्याप त्यांनी कुठल्याही पशुधन किंवा कुत्री यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडलेली नाही. 
          परंतु या भागात फिरायला येणाऱ्या नागरिकांवर अचानक बिबट्याचा हल्ला होऊ शकतो हेही तेवढेच खरे आहे त्यामुळे वन विभागाने या भागाची पाहणी करून पिंजरा लावण्याची नागरिकांनी केली आहे. 
           तर्डोबाववाडी ते जांभळी मळा  या परिसरात बिबट्याचा वावर आहे.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रात्री व पहाटे महिला वृद्ध नागरिक पुरुष फिरण्यासाठी येतात या नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.   
           वर्षाताई काळे माजी सरपंच तर्डोबावाडी ग्रामपंचायत
     जांभळी मळा तर्डोबावाडी बगाड रोड हा एकच परिसर असून या परिसरात दोन दिवसांपर्वी रात्रीच्या वेळेस बिबट्या वाहन चालकाने पाहिला आहे व त्याची व्हिडिओ काढले आहे . हा परिसर शहा यांच्या जमिनी जवळील आहे. वन विभागाने या भागातही एक पिंजरा लावावा. 
          गणेश खोले,माजी ग्रामपंचायत सदस्य तर्डोबावाडी       
      वन विभागाच्या वतीने जांभळी येथे बिबट्या आढळल्याने तो या एकाच परिसरात फिरत आहे त्यामुळे जांभळीमळा येथे २१ऑगस्ट रोजी पिंजरा लावला आहे.
       संतोष भुतेकर वनपाल, शिरूर

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!