शिरूर शहरातील रामलिंग जवळ असणाऱ्या सेंट जोसेफ शाळेत दारू पिऊन डीजे वाजून धिंगाणा चालू असल्याने त्याचा त्रास शेजारी राहणाऱ्या महिलेला होत होता डीजेचा आवाज कमी करण्याचे सांगितल्यावर शाळेच्या मुख्याध्यापक व इतर पंधरा जणांनी महिलेला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना घडून दोन महिने झाले तरी शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा नोंद करून घेत नसल्याने अखेर सुमन साळवे महिलेने पोलीस स्टेशन समोर अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर शिरूर पोलिसांनी या शाळे विरोधात गुन्हा दाखल केला.
सुमन सखाराम साळवे (वय ४४, रा. बगाड रोड, रामलिंग, शिरुर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
सुरेश चौगुले, अभिषेक जाधव व इतर १५जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २०जून रोजी रात्री साडे दहा वाजता घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक २० जून २०२४ रोजी रात्री साडे दहा वाजता फिर्यादी यांच्या घराशेजारी इंग्रजी माध्यमाची 'सेट जोसेफ' शाळा आहे. मंगळवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान शाळेतून डी.जे. सारखा कर्कश आवाज येत असल्याने सुमन साळवे यांचा मुलगा जीवन सखाराम साळवे हा युपीएससी स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासात अडथळा येत होता. या कर्कश आवाजासंदर्भात सुमन साळवे व जीवन साळवे यांनी त्या शाळेच्या वॉचमनला (नाव माहित नाही) या बाबत विचारणा केली. तेव्हा वॉचमनने शाळेमध्ये फोन केल्यावर तुम्हालाच आतमध्ये बोलावले आहे' असे त्याने सांगितले.
सुमन साळवे व जीवन साळवे आतमध्ये गेल्यावर त्यांना १० ते १५ महिला व पुरुष दारुच्या नशेत पार्टी करत असल्याचे दिसून आले. तेव्हा साळवे यांनी त्या घटनेचा आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ केला व त्या शाळेच्या मुख्याध्यापिका ज्ञानसी पायस यांना दाखविण्यासाठी त्यांच्याकडे गेल्या. प्रिसिपल मॅडम ज्ञानसी पायस व इतर २ महीला आल्या त्याचे देखील तोंडाचा दारू पिल्यासारखा वास येत होता म्हणून फिर्यादीनि मॅडम ज्ञानसी पायस यांना डी जे चा आवाज कमी करा असे म्हणाले असता त्या मला म्हणाल्या की, तु कोण असे म्हणुन इरत लोकाना म्हणाल्या की हिला धरून ठेवा आणि पोलीसांना बोलवा असे म्हणाल्या व तेव्हा हे सगळे दारूच्या नशेत असल्याने फिर्यादी बाहेर निघाले तेव्हा बाहेर जात असताना मॅडम (पुर्ण नाव माहीत नाही) यांनी फिर्यादीला लाथ मारली व त्यांचा मोबाईल घेतला व मुलगा जिवण सखाराम साळवे यास सुरेश चौघुले (पुर्ण नाव माहीत नाही) याने गचाडले व इतर त्याचे साथीदार यांनी देखील धक्काबुक्की केली परतु अंधार असल्यामुळे किती व्यक्ती होत्या ते दिसले नाही. त्यांनतर प्रिंसीपल मॅडम यांनी फिर्यादी व त्यांचे मुलाचे विरूध्द पोलीस स्टेशन शिरूर येथे खोटी तक्रार दिली आहे.
त्यांनतर सुरेश चौघुले व अभिषेक जाधव हे रस्त्याने येत जात असताना शिवीगाळ करून फिर्यादीचा मुलगा जीवन याला खाल्लास करून टाकतो अशी धमकी देवुन तुम्ही आमचे काही वाकडे करू शकत नाही असे म्हणुन त्रास दिला आहे म्हणून फिर्यादी यांनी वरील आरोपी विरोधात फिर्याद दिली असुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम बुद्रुक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले करीत आहे.