शिरूर शहर राष्ट्रवादी महीला काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने समाजासाठी अहोरात्र झटणारे शिरूर बस स्थानकातील वाहक व चालक अधिकारी यांना राखी बांधून आगळे वेगळे रक्षाबंधन केले आहे त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे.
कुठलाही सण असो परंतु एसटी बस त्यादिवशी बंद नसती अशा वेळेस वाहक व चालक सामाजिक बांधिलकी ठेवून आपले कर्तव्य पाडत असतो.
हा धागा पकडून शिरूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महीला संघटनेच्या वतीने आज एसटी बस स्थानकामध्ये येऊन एसटी चालक, वाहक , अधिकारी यांना राखी बांधून आगळे वेगळे रक्षाबंधन साजरे केले.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष श्रुतिका झांबरे, नगरसेविका मनीषा कालेवार,राष्ट्रवादी काँग्रेस युवती शहराध्यक्ष पूनम मुत्याल, उपाध्यक्ष सुवर्णा सोनवणे, सरचिटणीस सोनाली रायभोळे, युवती सचिव मोनिका राठोड, महिला सचिव मोनीका मोहिते उपस्थित होत्या.