आमदार अशोक पवार यांचा वाढदिवस ३० ऑगस्ट रोजी असुन मात्र शाळेला आगामी येणाऱ्या सण व स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी साउंडसिस्टीमची गरज होती याचा विचार करत शहरातील आमदार अशोक पवार विचार मंचाच्या वतिने हि सिस्टिम भेट देण्यात आली .
या वेळी शिरुर शहर विकास आघाडी अध्यक्ष ॲड सुभाष पवार शिरुर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार लीगल सेल अध्यक्ष ॲड रविंद्र खांडरे ,उद्योजक विनित बोरा, श्रीकृष्ण उद्योग समुहाचे सागर नरवडे ,पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष राहील शेख , शिरुर तालुका कार्याध्यक्ष हाफिज बागवान, व्यावसायीक मोहित साखला,आदिशक्ती महिला मंडळाच्या संस्थापिका शशिकला काळे ,आधार छाया फाउंडेशन संस्थापिका सविता बोरुडे ,डॉ. वैशाली साखरे ,कल्पना चांदगुडे ,प्रिती बनसोडे ,दुर्गा ननवरे शाळेच्या मुख्याध्यापिका उषा वेताळ ,शिक्षीका संपदा राठोड ,पर्यवेक्षक सचिन जाधव सह विद्यार्थी उपस्थित होते .
या वेळी विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार म्हणाले कि शिरुर शहरात पालीकेचे माजी सभागृह नेते प्रकाश धारीवाल व आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातुन अनेक कामे चालु असुन विचार मंचाच्या वतिने घेतलेला हा उपक्रम निश्चीतच कौतुकास्पद असुन नगरपरिषदेच्या शाळांना मदत करण्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढे आले पाहीजे असेही पवार म्हणाले .
प्रास्तावीक करताना लिगल सेलचे अध्यक्ष ॲड रविंद्र खांडरे यांनी विचार मंचाचे उद्दीष्ट विषद केली व सामाजीक भान ठेवत हा उपक्रम राबविला आमदार अशोक पवार यांचा वाढदिवस ३० ऑगस्ट रोजी असला तरी शाळेची गरज असल्याने त्यांना हा सेट प्रदान करण्यात आला .