शिरूर शहरातील बाबुरावनगर येथे अल्पवयीन मुलाच्या बॅगेत सापडला कोयता

9 Star News
0
शिरुर दिनांक (प्रतिनीधी )
       शिरूर शहरातील बाबुराव नगर येथे पेट्रोलिंग दरम्यान तपासणी करणाऱ्या पोलिसांना अल्पवयीन मुलाच्या सॅक मध्ये धारदार कोयता सापडला असून या प्रकरणी 16 वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
        याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी रघुनाथ भीमराव हळनोर यांनी फिर्याद दिली आहे.
       याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक ६ ऑगस्ट दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी शिरूर शहराचे उपनगर बाबुराव नगर येथे टाटा चौकात पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना वाहनांची तपासणी करत होते. यावेळी पांढऱ्या रंगाच्या ऍक्टिवावर आलेल्या अल्पवयीन मुलाची तपासणी केली असता त्याच्या सॅकमध्ये धारदार कोयता सापडला आहे. पोलिसांनी कोयता व त्याच्याकडे दुचाकी जप्त करून त्याच्यावर
 भारतीय हत्यार कायदा कलम 4,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील टपाल शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे
 यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक जगताप करीत आहे.
          
       
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!