शिरूर दिनांक प्रतिनीधी
शिरुर शहरात एका सुनेचे सासऱ्या बरोबर प्रांपंचिक वाद झाले होते या वादानंतर सुनेचे दोन भाऊ व एक बहीण सदर ठिकाणी आले त्यांनी बहिणीच्या सासर्याला केलेल्या जबर मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू झाला असून, शिरूर पोलीस स्टेशन येथे तिघाजनांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
वसंत दिलीप भोसले( वय ४३ रा. पाण्याच्या टाकीजवळ, शिरुर ) याचा मारहाणीत मृत्यू झाला आहे.
याबाबत खून झालेले ची मुलगी रेहाना महेमुब सय्यद (रा. उबाळनगर, वाघोली ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे.
नागरेष बाजीराव काळे, राजेश बाजीराव काळे व एक बहीण निघु बाजीराव काळे (सर्व रा. पाण्याच्या टाकीजवळ, शिरुर) यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे (दि १) ऑगस्ट रोजी दुपारी २ च्या सुमारास शिरुर येथील जिजामाता गार्डन जवळ होलमिल बेकरी जवळच्या डांबरी रोडवर वसंत भोसले यांचे त्यांची सुन अंजली रुवल काळे हिच्या सोबत घरगुती वाद झाले होते. या वादाच्या कारणावरुन चिडून सुनेचे दोन भाऊ नागरेश , राजेश, बहीण निघु ( सर्व रा. पाण्याच्या टाकीजवळ, शिरुर) यांनी कोयत्याच्या उलट्या बोथट बाजूने वसंत भोसले यांच्या छातीत, पायावर मारुन डांबरी रोडने फरपटत नेऊन जबर मारहाण केली या जबर मारहाणीत वसंत भोसले हे (दि ५) ऑगस्ट रोजी मरण पावले. या खून प्रकरणी वरील तिघा विरोधात शिरुर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या प्रकरणाचा आधिक तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले हे करत आहेत.