शिरूर ( प्रतिनिधी )
शिरूर शहरातील शाळेतील व कॉलेज मधील मुला मुलींना अश्लील वर्तन करण्याची मुभा देऊन त्यासाठी अवैध पार्टीशन टाकलेल्या १० ईलेव्हन कॅफे वर शिरूर पोलिसांनी साध्यावेशात ग्राहक म्हणून जाऊन छापा टाकून कॅफे चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
शिरूर शहरातील अशा कॅफेमधून इमारत मालकांना मोठ्या प्रमाणात भाडे मिळत असल्यामुळे ते अशा कॅफेना आपले गाळे भाड्याने देत आहेत. त्यांना याबाबत माहिती असूनही भाड्यापोटी त्याकडे दुर्लक्ष करत आहे अशा गाळेमालकांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे त्यामुळे गाळा भाड्याने देताना लोक विचार करतील.
याबाबत पोलिसांनी १० ईलेव्हन कॅफेचे चालक सौरभ शिवाजी पवार (वय २२ वर्षे रा. सिद्धार्थ नगर शिरुर ता. शिरूर जि. पुणे )याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई निलेश दत्तात्रय थोरात वय ३४ वर्षे रा. शिरुर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे शिरुर शहरातील वेगवेगळ्या कॅफे चालकांनी त्यांच्या कॅफे हॉटेल मध्ये अवैध पार्टीशन केल्याने शाळेतील व कॉलेज मधील मुले मुली हे असभ्य व अश्लील वर्तन करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांना मिळाली त्यांनतर पोलीस शिपाई निलेश थोरात, पोलीस हवालदार अरुण उबाळे, निलेश शिंदे, रघुनाथ हाळनोर, महिला पोलीस शिपाई रेश्मा पळसकर यांनी साध्या वेशात शहरातील १० ईलेव्हन कॅफे येथे जाऊन नाष्टा ऑर्डर देऊन आयमध्ये बसले असता त्यांना काही शालेय मुले मुली येऊन कॅफे चालकाने पार्टीशीयन केलेल्या रूममध्ये बसून असभ्य व अश्लील कृत्य करताना दिसून आले, तर अजूनही काही शाळकरी मुले मुली देखील तेथे येत असल्याचे दिसून आले,
याबाबत शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई निलेश दत्तात्रय थोरात वय ३४ वर्षे रा. शिरुर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी १० ईलेव्हन कॅफेचे चालक सौरभ शिवाजी पवार (वय २२ वर्षे रा. सिद्धार्थ नगर शिरुर ता. शिरूर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अरुण उबाळे हे करत आहे.