कान्हूरमेसाई ता शिरूर येथील ढगेवाडी वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वृध्द जखमी

9 Star News
0
शिरूर , दिनांक प्रतिनिधी
      कान्हूरमेसाई ता शिरूर येथील ढगेवाडी वस्तीवर साठ वर्षे शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले असून ,जखमी झालेल्या शेतकऱ्यावर शिरूर येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर या भागात तातडीने पिंजरा लावण्यात आला आहे जखमी शेतकऱ्यांची रुग्णालयात जाऊन वनविभागाच्या वतीने विचारपुस करण्यात आली आहे.
          कान्हूर मेसाई येथील अंकुश बाळा खर्डे (वय ६० वर्ष,कान्हूरमेसाई ता शिरूर )या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला असून त्यांच्या तोंडाला हाताला जखमा झाल्या आहेत.
      ही घटना (ता.२६) रोजी सकाळी सहा वाजता कान्हूर मेसाई (ता. शिरूर ) येथील ढगेवाडी वस्तीवर घडली. 
    ढगेवाडी वस्तीवर अंकुश खर्डे हे आपल्या कुटुंबासमवेत राहतात,ते नेहमी प्रमाणे सोमवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी चालायला गेले.त्याच रस्त्यावर त्यांची विहीर असल्याने पिण्याची पाण्याची मोटार चालू करायला गेले असता .सकाळी सहा वाजता शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक अंकुश खर्डे यांच्यावर हल्ला केला त्यांनी प्रसंगावधान राखून खर्डे यांनी जोरदार बिबट्याला प्रतिकार केला व आरडा ओरड केल्यानंतर बिबट्याने तेथून धूम ठोकली,या हल्ल्यात खर्डे हे जखमी झाले असून त्यांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत, जखमी झालेल्या खर्डे यांना तातडीने सॊमवारी सकाळी शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले 
असून त्यांना वनविभागाकडून लस दिली जाणार आहे. 
        शेतकऱ्यावर झालेल्या बिबट्याच्या हल्ल्याची माहिती तातडीने पुणे जिल्हा राष्ट्रवादी सरचिटणीस बबन शिंदे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवली. या परिसरात मागील महिन्यात बिबट्याने धुमाकूळ घातला होता, परंतु वन विभागाने पिंजरा लावल्यानंतर बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतर पुन्हा ही घटना घडल्याने शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे .वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयातजखमी शेतकऱ्याची विचारपूस केली, त्यांनतर वनपरिमंडळ अधिकारी गणेश पवार,नियतक्षेत्र अधिकारी नारायण राठोड, रेस्क्यू टीमचे हनुमंत कारकुड, शेरखान शेख,जयेश टेमकर, ऋषिकेश विधाटे, अमोल कुसाळकर, शुभम शिस्तार, सचिन गोडसे, सुदर्शन खराडेयांनी सदर ठिकाणी पाहणी केली असता बिबट्यांच्या पावलांचे ठसे आढळून आले असून वनविभागानेतातडीने सदर ठिकाणी पिंजरा लावला आहे, यावेळी पोलीस पाटील कमलेश शिर्के, पोलीस हवलदारराकेश मळेकर, विशाल देशमुख, बबन शिंदे, समाजसेवक शहाजी दळवी, फक्कड खर्डे, मनोज ढगे, गणेश गायकवाड, बबलू आदक, युवराज गायकवाड यांसह आदी उपस्थित होते,
          वन विभागाच्या वतीने कान्हूर मेसाई येथील ढगेवाडी वस्तीवर आज सकाळी तातडीने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. या अगोदरही पिंजरा लावला होता त्यात एक बिबट्या जेरबंद झाला होता. पुन्हा हल्ला झाल्याने वन विभागाच्या वतीने या परिसराची पाहणी केली असून, बिबट्याला पकडण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत.
         गणेश पवार वनपरिमंडल, कान्हूरमेसाई ता. शिरूर 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!