शिरूर ( प्रतिनिधी ) हिवरे कुंभार ता. शिरुर येथील सोसायटीच्या चेअरमन पदी राजेंद्र साळुंके तर व्हाईस चेअरमनपदी एकनाथ झेंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती सोसायटीचे सचिव अनिल जगताप यांनी दिली आहे.
हिवरे कुंभार ता. शिरुर येथील सोसायटीचे चेअरमन अनिल तांबे व व्हाईस चेअरमन काळूराम देशमुख यांनी राजीनामा दिल्याने नुकतीच निवडणूक निर्णय अधिकारी पी. बि. पिसाळ व सचिव अनिल जगताप यांच्या देखरेखेखाली चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक घेण्यात आली, यावेळी मावळते चेअरमन अनिल तांबे, व्हाईस चेअरमन काळूराम देशमुख, रेवणनाथ जाधव, संतोष गायकवाड, बाजीराव मांदळे, कैलास मांदळे, मच्छिंद्र गायकवाड, मुसाभाई शेख, राजेंद्र साळुंखे, एकनाथ झेंडे, शकुंतला देशमुख हे उपस्थित होते, यावेळी चेअरमन व व्हाईसचेअरमन पदासाठी अनुक्रमे राजेंद्र साळुंके व एकनाथ झेंडे यांनी अर्ज दाखल केला, दोघांच्या विरोधात कोणाचाही अर्ज न आल्याने सोसायटीच्या चेअरमन पदी राजेंद्र साळुंके तर व्हाईस चेअरमनपदी एकनाथ झेंडे यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी पी. बी. पिसाळ यांनी जाहीर केले, निवडीनंतर दोघांचा सरपंच दिपाली खैरे, उपसरपंच नयना मांदळे, माजी सरपंच अमोल जगताप, दिपक खैरे, विकास गायकवाड, शरद तांबे, शहाजी जाधव, विश्वनाथ शिर्के, सोमनाथ आढागळे, आबासाहेब तांबे, शामराव साळुंके, वसंत शिर्के, राजू गवारे यांसह आदींच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला, यावेळी बोलताना सोसायटीच्या माध्यमातून सभासद व शेतकऱ्यांना जास्त लाभ मिळवून देत सोसायटी आदर्श करणार असल्याचे नवनिर्वाचित चेअरमन राजेंद्र साळुंके यांनी सांगितले.
फोटो खालील ओळ – हिवरे कुंभार ता. शिरुर येथील चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करताना पदाधिकारी.