शिरूर
( प्रतिनिधी ) खैरेवाडी ता. शिरुर येथे शेतात शेळ्या चारणाऱ्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली असून,शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली
आहे .
पोपट नाथू खैरे (वय ६५ वर्षे रा. खैरेवाडी ता. शिरुर जि. पुणे) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
खैरेवाडी ता. शिरुर येथील पोपट खैरे हे शेतामध्ये शेळ्या व मेंढ्या चारण्यासाठी गेलेले असताना शेतात शेळ्या चारत असताना पोपट यांना शेतातील विजेच्या तारेचा धक्का बसल्याने पोपट जमिनीवर पडले, दरम्यान तेथील सार्थक खैरे याने आरडाओरडा केल्याने शेजारील नागरिकांनी विजेचा प्रवाह बंद करत पोपट यांना उपचारासाठी शिक्रापूर येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी पोपट नाथू खैरे वय ६५ वर्षे रा. खैरेवाडी ता. शिरुर जि. पुणे यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले, याबाबत हरीप्रसाद काशिनाथ खैरे वय ५८ वर्षे रा. खैरेवाडी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खर दिल्याने पोल्सिंनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस नाईक राकेश मळेकर हे करत आहे.