रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये टाटा स्टील कंपनी लोखंडी कॉईल उतरवण्यासाठी आलेल्या ट्रेलर चालकांकडून दमदाटी करून माथाडीची बोगस पावती देऊन फसवणूक केल्या प्रकरणी दोन अनोळखी तरुणांवर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत जितेंद्र श्रीराम कुशवाह (वय 34 वर्ष रा.पंखडकोला थाना तरकुआ जी.देवरिया राज्य. उत्तर प्रदेश) या ट्रक ड्रायव्हरने फिर्याद दिली आहे.
याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक 25 ऑगस्ट रोजी नऊ वाजता फिर्यादी हे त्याचे ताब्यातील ट्रेलर नंबर एम एच 14 ए क्यू 31 99 हा रांजणगाव एमआयडीसी मधील टाटा स्टील कंपनीत कॉइल खाली करण्यासाठी मेन गेट जवळ येऊन थांबले असताना दोन अनोळखी तरुण यांनी फिर्यादीस ' माथाडीची पावती फाडायला लागेल, टाटा स्टील कंपनीचे गेटमध्ये तुझी गाडी जाऊ देणार नाही, जर तू आठशे रुपयाची पावती फाडली नाही तर तुझ्या गाडीच्या काचा, टायर आम्ही फोडू' अशी धमकी देऊन फिर्यादी कडून 600 रु तसेच इतर दोन ट्रेलर यांच्याकडून प्रत्येकी आठशे रुपये असे एकूण बावीसशे रुपये घेऊन माथाडीची बोगस पावती देऊन फसवणूक केली. तसेच 28 ऑगस्ट रोजी पुन्हा फिर्यादी आठशे रुपयाची पावती पाडण्यासाठी धमकी देऊन रात्री बारा वाजता त्यांच्या ट्रेलरची हवा सोडून नुकसान केले आहे पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे करीत आहे.