शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर शहरातील तालुक्यांतील गणेश मंडळांनी गणेश उत्सव काळामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आक्षेपार्ह देखावे करणे टाळावे तर महिला मुली यांच्या सुरक्षितेसाठी पुढाकार घ्यावा व सर्व परवानगी घेऊन गणेश उत्सव साजरा करून शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करील प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी केले आहे.
शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने गणेशोत्सव मंडळांची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीत पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी शिरूर पोलीस स्टेशनची पोलीस अधिकारी उपस्थित होते शिरूर नगर परिषदेचे स्वच्छता विभाग डी बी बर्गे, वीज वितरण कंपनीचे उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभाग या सब विविध खात्यांचे अधिकारी शिरूर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाची अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सव हा आपल्या अस्मितेचा उत्सवातून प्रत्येक मंडळांनी मंडप साठी लागणाऱ्या नगर परिषदेच्या परवानगी, विज वितरण कंपनीकडून वीज कनेक्शन, धर्मदाय आयुक्त कडून परवानगी, शिरूर पोलीस स्टेशनचा नाहरकत दाखला यासह लागणाऱ्या सर्व परवानग्या घेऊनच गणेशोत्सव साजरा करावा. गणेश उत्सव काळात देखावे पाण्यासाठी आलेल्या महिला पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र देखावे पाहण्यासाठी रांगा करावे तसेच गणेश उत्सव काळामध्ये डीजेच्या मोठा आवाज ज्यामुळे नागरिकांना त्रास होईल असे डीजे वाजू नये, तसे नवीन पद्धतीच्या विद्युत रोषणाई ज्यांच्या प्रकाशामुळे नागरिकांना त्रास होईल अशा लेजर लाईट लावणे टाळावे.
गणेश उत्सवाच्या दहा दिवसाच्या काळामध्ये आपल्या गणपती बाप्पाचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांबरोबर होमगार्ड असतात त्याबरोबर आपल्या मंडळाचे ही कार्यकर्ते(स्वयंसेवक) रात्रीच्या वेळेस ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याची पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी सांगून गणेशोत्सव मिरवणूक काळात गुलालाची उधळण करण्याऐवजी फुलांची उधळण करावी तसेच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी गणेश मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी पोलीस व सर्वात प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हाने पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी केले.
गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकी दिवशी विसर्जन मार्गावर मोठ्या प्रमाणात विजेच्या व केबल तसेच व्यापाऱ्यांनी उन्हासाठी बचाव करण्यासाठी लावलेले पाल काढावे., विसर्जन मार्गावरील खड्डे भरून घ्यावे, यंदाही गणेश मंडळासमोर पोलीस किंवा होमगार्ड यांचा बंदोबस्त हवा त्याबरोबर मंडळाचे स्वयंसेवक ही त्यांच्याबरोबर राहतील अशा सूचना शहरातील विविध गणेश मंडळांनी केले.