निमोणे ता.शिरूर येथे घराच्या अंगणात खेळणाऱ्या दोन वर्षे वयाच्या चिमुरडीचा साप चावल्याने मृत्यू

9 Star News
0

शिरूर प्रतिनीधी 

निमोणे ता शिरूर येथे घराच्या अंगणात खेळणाऱ्या  दोन वर्षे वयाच्या चिमुरडीचा साप चावल्याने मृत्यू झाला असुन याबाबत मुलीच्या वडिलांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. 

      जान्हवी कुमारी विमलकुमार राम (वय २) या चिमुकलीचा साप चावल्याने मृत्यु झाला आहे.                  याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरवार दि २९ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास फिर्यादी विमलकुमार बहादुर राम (वय २७) सध्या रा. काळेवस्ती रोड, निमोणे ता. शिरुर, जि. पुणे, मुळ रा. दिघली, हसनपुर वार्ड ३३ किसनगंज, बिहार हे त्यांची पत्नी व मुलगी असे घरी असतांना मुलगी जान्हवी कुमारी ही घराच्या बाहेर अंगणात मांजरासेाबत खेळत होती.अचानक मुलीचा रडण्याचा आवाज आल्याने विमलकुमार राम आणि त्यांची पत्नी दोघेही घरातुन बाहेर आले असता. सापाने मुलीला डाव्या पायाला दंश करतांना त्यांनी बघितले. त्यानंतर त्यांनी मुलीली जवळ घेतले असतां साप हा जवळ असलेल्या बिळामध्ये जातांना दिसला त्यानंतर त्यांनी मालक संभाजी ढगे यांना फोन करुन सांगीतले. त्यानंतर त्यांचे मालक ढगे यांनी त्यांच्या गाडीत मुलीस उपचारसाठी शिरुर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले.

तेथील डॉक्टरांनी जान्हवी कुमारी विमलकुमार राम  हि उपचारापुर्वीची  मयत झाली असल्याचे घोषित केले. शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक विनोद मोरे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!