शिरूर प्रतिनीधी
शिरूर बाजार समिती कांदा मार्केट इथून शेतकऱ्याकडून विकत घेतलेला कांदा गुडगाव हरियाणा येथे विक्रीसाठी पाठवला असता ट्रक मालक व ट्रक चालकाने या कांद्याचा मध्येच अपहार करून व्यापाऱ्याची ८ लाख २३ हजार २२४ रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघा जणांना गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबात मच्छिंद्र लक्ष्मण रोडे (वय 45 वर्षे व्यवसाय बजरंग ट्रेडिंग कंपनी कांदा मार्केट शिरूर रा- भांबर्डे ता-शिरूर जि-पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पवनकुमार शर्मा , ट्रक चालक इसाक खान (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे फिर्यादी यांचे बजरंग ट्रेडिंग कंपनी असून त्यांनी शिरूर बाजार समिती आवारातील कांदा मार्केट येथून शेतकऱ्यांकडून विकत घेतलेला ४७६पिशव्या कांदा एकूण वजन २५ हजार ४९५ किलो कांदा किंमत ८ लाख २३ हजार २२४ रुपये हरियाणा गुड्स कॅरियर्स सावरगाव येवला जिल्हा नाशिक यांनी पाठवलेल्या ट्रक नंबर एच आर 73/9756 चे चालक इसाक खान पूर्ण नाव पत्ता माहीती नाही यांच्या बरोबर रावल ट्रेडिंग कंपनी गुडगाव हरियाना राज्य या ठिकाणी विक्रीकेल्याने पोहोच करण्या करीता दिला असता तो त्या ठिकाणी पोहच न करता त्या मालाचा अपहार करून फिर्यादी यांची आर्थिक फसवनुक ट्रकचे मालक व चालक यांनी केली आहे. म्हणून त्यांचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नाथसाहेब जगताप करीत आहे.