शिरूर
( प्रतिनिधी ) निमगाव म्हाळुंगी ता. शिरुर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ग्रामपंचायत व श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने गावामध्ये हर घर तिरंगा अभियानाला सुरवात करण्यात आल्याचे सरपंच बापूसाहेब काळे यांनी सांगितले आहे.
निमगाव म्हाळुंगी ता. शिरुर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येणार असून श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार सूर्यकांत पलांडे तसेच पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच बापूसाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असताना ९ ऑगस्ट पासून १५ ऑगस्ट पर्यंत देशाच्या गौरव व सन्मानासाठी गावात प्रत्येक घरावर तिरंगा लावण्यात येणार आहे, सदर उपक्रमासाठी नुकतेच तिरंगा प्रतिज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियाना मध्ये शाळेतील अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी शाळेतील मुलांचा मोठा उत्साह दिसून आला. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका मंदाकिनी काळकुटे, ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले, फैज जमादार, अनिल गुंजाळ, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुजाता चव्हाण, कामिनी नागवडे, बाबुराव चौधरी यांसह आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका मंदाकिनी काळकुटे यांनी केले तर प्रास्ताविक सरपंच बापूसाहेब काळे यांनी केले आणि ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले यांनी आभार मानले.
फोटो खालील ओळ – निमगाव म्हाळुंगी ता. शिरुर येथे हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात करताना सरपंच बापूसाहेब काळे.