. हुतात्मा स्मारकावर पुष्पहार अर्पण करुन देशभक्तीपर घोषणा यावेळी देण्यात आला . लोकजागृती चळवळीचे माजी नगरसेवक रवींद्र धनक , ॲड . ओमप्रकाश सतीजा , शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड . सुभाष पवार , सुकुमार बोरा , माजी नगराध्यक्ष नसिम खान , प्राचार्य डॉ . द्वरकादास बाहेती , रमेश कर्नावट ,माजी उपनगरध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल , जैन युवा परिषदचे प्रकाश बाफना , जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर , माजी नगरसेवक मंगेश खांडरे , खुशाल गाडे , संजय बांडे , संदिप कडेकर , ॲड .सुभाष जैन , डॉ . पौर्णिमा राव , प्रा. विलास आंबेकर , नीलेश नहार , राजेंद्र परदेशी आदी यावेळी उपस्थित होते . क्रांतीदिन आणि राष्ट्रसंत आचार्य सम्राट १००८ पूज्य गुरुदेव श्री आनंदऋषिजी म.सा. यांच्या १२४ व्या जयंती निमित्त लोकजागृती चळवळीचा वतीने शिरुर नगरपरिषद मंगल कार्यालयात ३२ व्या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले . यावेळी चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील व सिताबाई थिटे फार्मसी कालेज मधील एनसीसी व एनएसएसचा विद्यार्थ्यानीही रक्तदान केले . एकूण ८२ रक्तदात्यांनी रक्तदान केले . रक्तदान शिबीरात नीलेश मोहनलाल खाबिया यांनी ६९ वे तर त्याच्या मुलगा मीत ने ११ वे रक्तदान केले . सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल, पुणे. ची रक्तपेढी रक्त संकलनासाठी आली होती .
क्रांती दिना निमित्त शिरूर येथे हुतात्म्यांना अभिवादन व रक्तदान शिबिर
ऑगस्ट ११, २०२४
0
शिरुर दिनांक (वार्ताहर) ऑगस्ट क्रांतीदिना शिरुर शहरात लोकजागृती चळवळीचा वतीने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्मांना अभिवादन करण्यात आले यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात 82 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
Tags