रामलिंग महाराज की जय... हर हर महादेव... जयघोष करीत पवित्र श्रावण मासाच्या पहिल्याच सोमवारी हजारो भाविकांनी घेतले श्री रामलिंगाचे दर्शन.
शिरूर शहर व पंचक्रोशीचे आराध्य व जागृत देवस्थान श्री रामलिंग याकडे मोठी भक्ती या परिसरातली तालुक्यातील व राज्यातील भक्तांची आहे.
पवित्र श्रावण मासाची आज सुरुवात आणि पहिल्याच दिवशी सोमवारचा योग आल्याने यास मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
आज पहाटे चार वाजल्यापासून शिरूर शहर ते रामलिंग असे पायी वारी करणारे महिला पुरुष भक्तांनी यांनी श्री रामलिंगांचे दर्शन घेतले.
आज पहाटे पासून ते रात्रीपर्यंत हजारो भक्त यांनी श्री राम लिंगाचे दर्शन घेतले सकाळपासूनच मोठी रांग दर्शनाला लागल्याचे दिसून आले.
श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी चोख व्यवस्था करण्यात आली होती
देवस्थानचे अध्यक्ष प्रकाशभाऊ धारीवाल,यांच्या मार्गदर्शनाखाली खजिनदार पोपटराव दसगुडे,, विश्वस्त वाल्मीकराव कुरुंदळे, बलदेवसिंग परदेशी, रावसाहेब घावटे पाटील,जगन्नाथ पाचर्णे ,बबनराव कर्डिले,
हे सर्वजण भक्तांना कुठली गैरसोय होऊ नये याकडे लक्ष देत होते तर अनेक भक्तांनी श्रावणी सोमवारी निमित्त केळी वाटप साबुदाणा खिचडी वाटप केले.
पेढ्याची व खेळण्याची दुकाने सजली होती त्यामुळे या भागाला यात्रेचे स्वरूप आले होते.