नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त रक्तदान शिबिराची आयोजन करण्यात आले असल्याची माहिती लोक जागृती चळवळीचे अध्यक्ष रवींद्र धनक यांनी सांगितले.
हे रक्तदान शिबिर शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालय येथे सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीर आणि हुतात्म्यांना 9 ऑगस्ट सकाळी पावणे दहा वाजता हुतात्मा स्मारक येथे अविवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिर सुरू होईल.
शिरूर शहर तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या अभिवादन व रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन धनक यांनी केले आहे.