शिरूर वन विभागाच्या कार्यालयात अधिकारी नाही कर्मचारी नाही कार्यालय रामभरोसे

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
     शिरूर तालुक्याचे वन विभागीय कार्यालय अधिकारी व कर्मचारी नसल्याने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ओस पडले होते तर या कार्यालयाची रखवालदारी येथील एक वाहन चालक करीत असल्याचे निदर्शनास आल्याने शिरूर वन कार्यालयाचा अधिकारी सह कर्मचाऱ्यांचा मनमानी  कारभार समोर आला आहे. 
      आज आठवड्याचा पहिला सोमवार दुपारी बारा वाजता शिरूर वन विभागीय कार्यालयामध्ये ना, वनपरिक्षेत्र अधिकारी, ना लिपिक, ना कुठला अधिकारी, ना शिपाई या कार्यालयात उपस्थित नव्हता. या कार्यालयावर कोणाचा धाक आहे का नाही असेच म्हणावे लागेल. 
      या कार्यालयात असणारे महत्त्वाची कागदपत्रे कार्यालयीन अधिकारी किंवा वनपरिक्षेत्राधिकारी कोणाच्या भरोशावर ठेवत आहे. या कागदपत्रांची सुरक्षा रामभरोसे म्हणावे लागेल.
      सव्वा दहा ते साडे दहा पर्यंत सर्वच शासकीय कार्यालयीन कर्मचारी येणे गरजेचे असते. परंतु सव्वा बारा वाजले तरी शिरूर वन विभागीय कार्यालयात कोणीच वाली नव्हता. त्यामुळे येथील टेबल खुर्च्या या कर्मचाऱ्यांची वाट बघत असल्याचे दिसून आले. 
        यावरून शिरूर वनविभागात सर्व काय आलल नसल्याचे दिसून आले. तालुक्यातून एखादा नागरिक आपले काम घेऊन जर या कार्यालयात आले तर त्यांची कामे करणार कोण ? असा सवालही पडतो. शिरूर वनविभागीय कार्यालयाचे प्रमुख याकडे लक्ष देतील का?
              वन विभागाच्या मनमानी कारभाराचा वरिष्ठ दखल घेणार आहेत का नाहीत नाहीतर कार्यालयाचे तीन तेरा नऊ बारा होणार हे नक्की 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!