शिरूर तहसील कार्यालयाच्या महसूल दिनानिमित्त घेण्यात आलेला महसूल पंधरवडा म्हणजे शासकीय फार्स म्हणून केवळ देखावा केले असलेची चर्चा शिरूर तालुक्यात रंगली आहे.
शिरूर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात काल महसूल पंधरवडा या कार्यक्रमाचा शुभारंभ तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या हस्ते झाला. हा कार्यक्रम दुपारी बारा वाजता होणार होता परंतु या कार्यक्रमाला गर्दी नसल्याने कार्यक्रमाची वेळ दुपारी दोन घेण्यात आली. यावेळेस आलेल्या अंगणवाडी सेविकांना व महिला अधिकाऱ्यांना महिलांची गर्दी जमवण्यासाठी सांगण्यात आले होते त्यावेळी कुठे थोड्या प्रमाणात गर्दी झाली.
दुपारी दोन वाजता या सर्व महिला कर्मचाऱ्यांनी महिलांची गर्दी केली आणि शिरूर तहसीलदार कार्यालयाचा महसूल दिन शुभारंभ करण्यात आला.
यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 56 हजार अर्ज भरले असल्याचा भीमपराक्रम आम्हीच केला असल्याचे महसूल खात्याच्या वतीने सांगण्यात आले.
तर महसूल पंधरवडा नक्की कशासाठी यामध्ये काय काय होणार आहे याबाबतची माहिती तालुक्यातील नागरिकांना नाही. केवळ दिखावा म्हणून हे सर्व केले असल्याचे दिसून आले.
केवळ जिल्हा अधिकाऱ्यांनी केलेला फार्स आणि त्याची केवळ अंमलबजावणी करण्याचा म्हणून शिरूर येथील महसूल खात्याने महसूल पंधरवडेचा दिखावा केला आहे असेच म्हणावे लागेल.