जातेगाव बुद्रुक मध्ये बिबट्याने पाडला बोकडाचा फडशा

9 Star News
0
जातेगाव बुद्रुक मध्ये बिबट्याने पाडला बोकडाचा फडशा
शिरूर 
( प्रतिनिधी ) जातेगाव बुद्रुक ता. शिरुर येथील होळकर वस्ती येथे एका शेतकऱ्याच्या बोकडाचा सायंकाळच्या सुमारास बिबट्याने फडशा पाडला असून येथे पिंजरा लावण्याची मागणी सरपंच निलेश उमाप व नागरिकांनी केली आहे.
                  जातेगाव बुद्रुक ता. शिरुर येथील होळकर वस्ती येथे बाळासाहेब होळकर हे सायंकाळच्या सुमारास घरात बसलेले असताना अचानक शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने बाळासाहेब यांच्या घरातील महिला बाहेर आल्या असता बिबट्या बोकड ओढून घेऊन चालल्याचे दिसल्याने महिलांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या तेथून धूम ढोकून शेजारील शेतात पळून गेला याबाबतमाहिती वनपाल गौरी हिंगणे यांना मिळताच वनरक्षक बबन दहातोंडे, रेस्क्यू टीमचे शेरखान शेख यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला यावेळी सरपंच गणेश उमाप, बाळासाहेब होळकर, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संचालक दत्ता कवाद, गणेश होळकर, बबन पवार यांसह आदी उपस्थित होते, तर यावेळी वनविभागाने येथे पिंजरा लावण्याची मागणी सरपंच गणेश उमाप यांनी केली असून लवकरच येथे पिंजरा लावण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे वनरक्षक बबन दहातोंडे यांनी सांगितले.
फोटो खालील ओळ - जातेगाव बुद्रुक ता. शिरुर येथे बिबट्याने फडशा पडलेल्या बोकडाचा पंचनामा करताना कर्मचारी.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!