शिरूर विधानसभा मतदारसंघात माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे भाजपाकडे एक पर्याय

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
        येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिरूर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार स्व.बाबुराव पाचर्णे यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे हे भारतीय जनता पार्टी पक्षाकडून उमेदवारी मागू शकतात त्यामुळे शिरूर तालुक्याला पुन्हा एकदा पाचर्णे यांच्या रूपाने नेतृत्व मिळू शकते. 
        शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकी रिंगणामध्ये उतरण्याच्या तयारीत आहे. अनेकांनी त्याची तयारीही सुरू केली आहे. 
          भारतीय जनता पक्षाकडून अनेक जण इच्छुक असले तरी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल पाचर्णे यांच्या वडिलांचा मोठा जनसंपर्क त्यांची असलेली सर्वच पक्षाच्या नेत्यातील फळी पक्ष कुठला असला तरी आमचा नेता फक्त बाबुराव पाचर्णे असे म्हणणाऱ्या अनेक नेते तळागाळातील गोरगरीब कार्यकर्ते आजही स्वर्गीय पाचर्णे ज्यांच्या उपकाराची किंवा मैत्रीची जाण ठेवत आहे. त्यामुळेच पाचर्णे यांचा वारस म्हणून राहुल पुढे येत आहे.
          तसेच भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या  अतिशय जवळचे म्हणून माजी आमदार स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांचे नाव आजही आहे. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची जवळची सलगी आणि आंदोलन ,राजकारण ,समाजकारण, धार्मिकता याबाबत माहिती असलेला व गोरगरीब शेतकरी यांची नाळ ओळखनारा नेता म्हणून स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांच्याकडे भाजप कडून पाहिले जात होते.
          शिरूर तालुक्याला स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांच्या माध्यमातून मंत्रीपद मिळेल अशी आशा शिरूर तालुक्यातील नवे तर संपूर्ण शिरूर हवेली मतदार संघामध्ये होती. परंतु देवापुढे कोणाचे काही चालत नाही या म्हणीप्रमाणे त्यांचे निधन झाले. 
       त्यानंतरही शिरूर हवेलीतील मोठा मतदार शेतकरी सर्वसामान्य गरीब जनता आजही त्यांचे चिरंजीव  जिल्हा परिषद माजी सदस्य  राहुल पाचर्णे यांच्या पाठीमागे असल्याचे नुकतेच पाचर्णे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमात दिसून आले.
        त्यामुळे येणाऱ्या विधानसभा मतदारसंघ निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला राहुल पाचर्णे यांच्या माध्यमातून एक नवीन उमदा चेहरा मिळू शकतो तसेच स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांनी केलेल्या कामाची व त्यांनी जोडलेल्या माणसांची साथ राहुल  यांना मिळू शकते. 
          त्यामुळे भारतीय जनता पार्टी पक्षांकडून शिरूर तालुक्यातून आणखी एक ताकदवान चेहरा म्हणून राहुल पाचर्णे होऊ शकतात त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजताना पाचर्णे यांचे नाव इच्छुकांच्या यादीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून नक्कीच असणार आहे हे म्हणणे वावगे ठरणार नाही.
          
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!