शिरूर ते उज्जैन महाकाल दर्शनासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके या पुत्राकडून शिरूर शहर व पंचक्रोशी तालुक्यातून तीन हजार महाकाल भक्तांना पाठवले असून या अगोदरही शिरूर तालुका हवेली तालुक्यातील हजारो नागरिकांना त्यांनी महाकाल दर्शन घडवले आहे.
जय महाकाल.... रामलिंग महाराज की जय... शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे , पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, माजी मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा जयघोष यावेळी महाकाल भक्तांनी केला.
आज सकाळी तीन हजार पंचक्रोशी व तालुक्यातील महाकाल भक्तांची रेल्वे केळगाव दौंड येथून उज्जैन या ठिकाणी रवाना झाली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला वर्गांचा समावेश असून काही तरुण काही वयस्कर नागरिक यांच समावेश आहे महाकाल दर्शन होणारी यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात खुश दिसत होते.
या रेल्वेचे पूजन शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे वारे वाहत असताना शिरूर विधानसभा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात जनसंपर्क व्हावा यासाठी व शेतकरी, सर्वसामान्य, गरीब नागरिकांना उज्जैन येथील महाकाल देवाचे दर्शन श्रावण या पवित्र महिन्यात व्हावे यासाठी सर्व खर्च स्वतः उचलत शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख माऊली कटके यांनी याचा खर्च उचलला आहे.
शिरूर ते महाकाल दर्शनामध्ये जे नागरिक उज्जैन येथे निघाले आहे त्यांच्या सेवेसाठी खास स्वयंसेवकांची नेमणूक केली असून नागरिकांना पिण्याचे पाण्याचे बॉटल्स, सकाळी नाष्टा दुपारी थंडपेया पाण्याची बॉटल जेवण चहा रात्रीचे जेवण याची नियोजन करण्यात आले आहे.
ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांनी या अगोदर शिरूर विधानसभा मतदारसंघात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या अनेक नागरिकांना शेतकऱ्यांना नदीकडील गावातील गोरगरीब लोकांना मोठ्या प्रमाणात मदतीचा हात दिला आहे. अडचणीत असणाऱ्या नागरिकांना ही मोठ्या प्रमाणात मदत करण्याचे काम कटके यांच्यामार्फत सुरू आहे.
माऊली कटके यांच्यावतीने मोठ्या प्रमाणात शिरूर तालुक्यात जनसंपर्क बरोबर नागरिकांच्या गोरगरीब सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून येऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. सर्वसामान्य नागरिकांना पवित्र श्रावण महिन्यात महाकालचे दर्शन घडवून देणे हे सर्वात मोठे धार्मिक व पुण्याचे काम आहे. यांचा आशीर्वाद नक्कीच कटके यांना मिळणार आहे.
सुनील जाधव, माजी शहर प्रमुख,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.
उज्जैन दर्शनासाठी शिरूर वरून मोठ्या प्रमाणात महिला पुरुष तरुण यांना मोफत महाकाल दर्शनाचे योग माऊली कटके यांनी आणून दिला आहे. या सहलीमध्ये अतिशय उत्कृष्ट नियोजन व आम्हा सर्व भाविकांची पोटच्या मुलासारखी काळजी घेत असून आम्हाला आयुष्यात पहिल्यांदाच महाकाल दर्शनाचा जाण्याचे योग आला तोही माऊली कटके या आमच्या भावामुळे, अनेक वृध्द महिलांना पुत्रामुळे,
आमच्या यादर्शनाचे पुण्य माऊली कटके यांना मिळो अशी महाकाल चरणी प्रार्थना करणार आहे.
वैशाली गायकवाड, महाकाल भाविक