शिरुर मध्ये बाजारात आलेल्या महिलेचा विनयभंग
( प्रतिनिधी ) शिरूर येथे बाजारात बाजार घेण्यासाठी आलेल्या महिलेचा तरुणाने विनयभंग केल्याने त्याच्यावर शिरूर पोलीस स्टेशन येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
सोहेल मोबीन शेख (रा. रामलिंग शिरुर ता. शिरुर जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या चे नाव आहे.
शिरुर येथील मुंबई बाजारात एक महिला भाजीपाला खरेदी साठी आलेली असताना सोहेल शेख हा युवक बाजारात आला, त्याने महिलेजवळ जाऊन महिलेच्या मनास जल निर्माण होईल असे वर्तन करत महिलेचा विनयभंग केला, घडलेल्या प्रकाराबाबत पिडीत महिलेने शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी सोहेल मोबीन शेख रा. रामलिंग शिरुर ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा द्काहाल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार हे करत आहे.