शिरूर
( प्रतिनिधी ) कोरेगाव भिमा ता. शिरुर येथील श्रीमंतयोगी वाद्य पथकाने सामाजिक बांधिलकी जपत सलग पाचव्या वर्षी एक राखी दिव्यांगांसाठी हा उपक्रम राबवत श्रीमंतयोगी वाद्य पथकातील रणरागिणींनी सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयातील विशेष विद्यार्थ्यांना राखी बांधून त्यांचे तोंड गोड करत रक्षाबंधन साजरे केले आहे.
पिंपळे जगताप ता. शिरुर येथील सेवाधाम मतिमंद निवासी विशेष विद्यार्थ्यांना श्रीमंतयोगी वाद्य पथकातील रणरागिणींनी रक्षाबंधन साजरे करत विशेष विद्यार्थ्यांना बांधत त्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करुन विशेष विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला, यावेळी सेवाधामचे मुख्याध्यापक पवन कट्यारमल, वाद्य पथकाचे संस्थापक सागर गव्हाणे, अध्यक्ष कालिदास शिंगाडे, उपाध्यक्ष योगेश ढगे, स्वप्निल गव्हाणे, आदेश गव्हाणे, भाग्येश खोले, कालिदास ढगे, कार्तिकेश कांबळे, ज्ञानेश्वरी निकम, श्रद्धा पिंपळे, सलोनी राठोड, मिनल परब, साक्षी भुजबळ, अश्विनी भगत, संध्या कावडे, काजल पाटील यांसह आदिया उपस्थित होते. दरम्यान उपस्थितांनी विशेष विद्यार्थ्यांसह संवाद साधत त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तर यावेळी बोलताना श्रीमंतयोगी वाद्यपथकातील भगिनीं रक्षाबंधन साठी दरवर्षी येऊन सण साजरा करतात यामुळे दिव्यांग मुलांकडे पाहण्याचा सकारात्मक संदेश जात असल्याचे सेवाधामचे मुख्याध्यापक पवन कट्यारमल यांनी सांगितले तर दिव्यांग विद्यार्थ्यांना वाजवण्यासाठी वाद्य हवे असल्यास ते पथकाच्या वतीने मोफत देण्याचे आश्वासन श्रीमंतयोगी वाद्य पथकाचे संस्थापक सागर गव्हाणे दिले, यावेळी कालिदास ढगे यांनी सर्वांचे आभार मानले.
फोटो खालील ओळ - पिंपळे जगताप ता. शिरुर येथील सेवाधाम मतिमंद विद्यालयात रक्षाबंधन साजरे करताना वाद्य पथक.