शिरूर शहरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व पुतळा व्हावा या मागणीसाठी केलेल्या उपोषणास पाठिंबा म्हणून हलगी मोर्चा

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
     शिरूर नगर परिषद मंगल कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसापासून उपोषणास बसलेले लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हा कोर कमिटी अध्यक्ष दादाभाऊ लोखंडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व पुतळा बसवावा या मागणीसाठी केलेले उपोषण तिसऱ्या दिवशी सुरू होते या उपोषणाची दखल प्रशासनाने न घेतल्याच्या निषेधार्थ लहुजी शक्ती सेनेच्या वतीने शिरूर नगरपरिषदेत हलगी मोर्चा काढून आगळे वेगळे आंदोलन केले  यावेळी आंदोलनकर्ते संतप्त झाले होते.
हा हलगी मोर्चा उपोषण करते बसलेले शिरूर नगर परिषद मंगल कार्यालय जूनी इमारत ते शिरूर नगरपरिषदेची नवीन इमारत या मार्गावर काढण्यात आला होता.
यावेळी उपोषणास मातंग समाजाचे नेते विष्णूभाऊ कसबे यांनी भेट दिली.
        यावेळी आंदोलनकर्त्यांनी नगर परिषदेच्या विरोधात व सर्व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. 
या हलगी मोर्चात लहूजी शक्ती सेनेचे संजय फाजगे, किरण जाधव, विशाल जोगदंड, माजी नगरसेविका रेश्मा लोखंडे , सतीश बागवे यांच्या सह विविध संस्था संघटनाचे कार्यकर्ते व महिला सहभागी झाल्या होत्या.        
       या मोर्चाच्या वतीने नगरपरिषदस मागण्याचे निवेदन देण्यात आले. कार्यालयीन अधीक्षक राहुल पिसाळ यांनी हे निवेदन स्वीकारले. 
   १८ ऑगस्ट २०२४ पासून शिरूर नगरपरिषद जुनी इमारत या ठिकाणी दादाभाऊ एकनाथ लोखंडे मातंग समाजाचा प्रतिनिधी म्हणून साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे शिरूर शहरात योग्य त्या जागेवर आरक्षण टाकून उचित स्मारकासाठी जागा आरक्षित करून सदर ठिकाणी शिरूर नगरपालिकेच्या वतीने लोकशाहीराला व शिरूर शहराला साजेसे स्मारक व पुतळा व्हावे यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.
       शिरूर शहरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे पुतळा व स्मारक व्हावे.शिरूर शहरातील सर्व झोपडपट्टी धारकांचे पुर्नवसन करून आहे त्याच ठिकाणी झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्प राबवूण त्यांना हक्काची घरे मिळावी लाटेआळी येथील मातंग वस्ती येथे कमान टाकावी व समाजाचे समाज मंदीर उभारावे.शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावात मातंग समाजाच्या वस्तीत समाज मंदीर करण्यात यावे या मागण्यासाठी हे उपोषण सुरू आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!