तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी व मुखईच्या शाळेची बाजी
शिरूर तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत विठ्ठलवाडी, तळेगाव ढमढेरे, मुखई येथील शाळांनी प्रथम क्रमांक पटकावले.
पुणे जिल्हा क्रीडा परिषद, शिरूर तालुका क्रीडा संघटना व गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातून विविध शाळांतून ९७ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, मानद सचिव अरविंददादा ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, संचालक विजय ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे, उद्योजक मंदार पवार यांच्या हस्ते झाले. तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :-
१४ वर्षे वयोगट (मुले) प्रथम : पांडुरंग विद्यामंदिर (विठ्ठलवाडी), द्वितीय : कै. रामराव गेनुजी पलांडे आश्रम शाळा (मुखई), तृतीय : स्वा.सै.रायकुमार बी. गुजर प्रशाला (तळेगाव ढमढेरे). १७ वर्षे (मुले) प्रथम : स्वा.सै.रायकुमार बी.गुजर प्रशाला (तळेगाव ढमढेरे),
द्वितीय : कै.रा.गे. पलांडे माध्य. आश्रम शाळा (मुखई), तृतीय : न्यू इंग्लिश स्कूल (भांबर्डे). १९ वर्षे (मुले) प्रथम : स्वा.सै.रायकुमार बी. गुजर उच्च माध्यमिक प्रशाला (तळेगाव ढमढेरे), द्वितीय : समाजभूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (तळेगाव ढमढेरे),
तृतीय : कै.रा.गे.पलांडे आश्रम शाळा (मुखई). १४ वर्षे (मुली) प्रथम :
पांडुरंग विद्यामंदिर (विठ्ठलवाडी), द्वितीय : न्यू इंग्लिश स्कूल (भांबर्डे),
तृतीय : श्री गुरुदत्त विद्यालय (पिंपरखेड). १७ वर्षे (मुली)
प्रथम : स्वा.सै. रायकुमार बी. गुजर प्रशाला (तळेगाव ढमढेरे), द्वितीय : कै.रा.गे.पलांडे आश्रम शाळा (मुखई), तृतीय : श्री गुरुदत्त विद्यालय (पिंपरखेड). १९वर्षे (मुली)
प्रथम : कै.रा.गे. पलांडे माध्यमिक आश्रम शाळा (मुखई), द्वितीय : स्वा.सै रायकुमार बी.गुजर प्रशाला (तळेगाव ढमढेरे), तृतीय : समाजभूषण संभाजीराव भुजबळ उच्च माध्यमिक विद्यालय (तळेगाव ढमढेरे). स्पर्धेतील उत्कृष्ट संघ म्हणून स्वा.सै.रायकुमार बी.गुजर प्रशालेच्या १७ वर्षे मुलांच्या संघाची निवड करण्यात आली. उत्कृष्ट खेळाडू म्हणून पायल गवारे, वेदांत गवारे यांची निवड करण्यात आली. तर उत्कृष्ट पंच म्हणून प्रशांत पोळ व विशाल कदम यांची निवड झाली. स्पर्धेचे नियोजन क्रीडा विभाग प्रमुख राजेंद्र भगत, नंदा सातपुते व गोरक्षनाथ वाळके यांनी केले.