शिरूर प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील कारेगाव -रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड कंपनीतील विषारी केमिकलचे पाणी ओढ्या नाल्यांवर सोडल्याने निमगाव भोगी, आण्णापूर, रामलिंग , कर्डील वाडी, सरदवाडी, कारेगाव, शिरूर ग्रामीण ,ढोक सांगवी, शिरूर शहर या गावातील नागरिकांच्या जीवावर हे पाणी उठले आहे उठले आहे यामुळे अनेक गंभीर आजार येथील नागरिकांना होत असून या विरोधात या सर्वच गावच्या नागरिकांनी एल्गार पुकारला असून दिनांक २८ ऑगस्ट रोजी पुणे नगर महामार्ग रांजणगाव गणपती येथे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे बाधितांनी सांगितले आहे.
या आंदोलना अगोदर शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी कंपनी व्यवस्थापन व संबंधित गावचे नाकरीक यांची बैठक शिरूर तहसील कार्यालय येथे बोलवली होती परंतु नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे समजतात ही बैठक गुंडाळण्यात आली. यावेळी नागरिकांनी कंपनी व्यवस्थापक अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
यावेळी बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे , माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर,रामलिंगचे माजी सरपंच अरुण घावटे ,नामदेव जाधव,पंचायत समिती माजी उपसभापती वाल्मिकराव कुरुंदळे पंचायत समिती सदस्य दादा पाटील घावटे पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे शिरूर नगरपालिका नगरसेवक विठ्ठल काका पवार अण्णापूर विद्यमान सरपंच दीपिकाताई शिंदे उपसरपंच संतोष शिंदे शिरूर ग्रामीण माजी सरपंच विठ्ठल घावटे
कर्डेलवाडी सरपंच सरदवाडी सरपंच उपसरपंच निमगाव भोगी सरपंच उज्ज्वला इचके उपसरपंच सांबारे सरदवाडी सरपंच उपसरपंच उपस्थित होते.
हे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडून देत असल्यामुळे निमगाव भोगी, आण्णापूर, रामलिंग , कर्डील वाडी, सरदवाडी, कारेगाव, शिरूर ग्रामीण ,ढोक सांगवी या गावांचे पाणी पुर्णपणे दुषित झाले असून हे केमिकलचे फेसाळयुक्त काळे पाणी परिसरातील ओढया नाल्यांमधून या गावांमधून वाहत येत आहे.ओढ्याला येणारे पाणी काळ्या व लाल रंगाचे पाणी तसेच पाणी आल्यानंतर बंधाऱ्या वरून पडणारे पाणी आपटल्यानंतर मोठाले पांढऱ्या रंगाचे फेसाचे ढिग तयार होतात.हे दुषित पाणी जमिनित मुरल्यामुळे व तेच पाणी पुरवठा विहीरींना मिळत असल्याने तेच पाणी पिण्यासाठी वापरात येत असल्याने या परीसरातील शेकडो नागरीकांना कर्करोगाला , कॅन्सर, त्वचारोग यांना बळी पडावे लागले असून या भागातील पेशंटची संख्या झपाट्याने वाढत चालली असल्याचे रामलिंगचे माजी सरपंच विठ्ठल घावटे , पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे , तेजस फलके, शरद नवले यांनी सांगितले आहे. ...
सदर कंपनी ही केमिकल झोन व बिगर रहिवासी झोन (निमर्नुष्य) परिसरात घेण्याऐवजी बेकायदेशिररित्या या परिसरात अनाधिकृतपणे चालु आहे. असे येथील नागरीकांचे म्हणणे आहे.
कपंणीच्या हे दुषित पाणी सोडल्याने परीसरातील शेतातील विहीर काळ्यापाण्यामुळे दुषित झाल्या आहेत. ते पाणी शेतीला वापरल्यामुळे भाजीपाला व अन्नधान्य खाण्यायोग्य राहिले नाही. एमआयडीसी शेजारील कारेगाव, ढोकसांगवी, सरदवाडी ,कर्डीलवाडी गावात पिकणारा भाजीपाला लोकांनी खाण्याचे बंद केले आहेत. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे रामलिंग पंचायत हद्दीतील महाजनमळा, लोंढेमळा व बो-हाडेमळा या वसाहती
ओढ्यालगत आहेत. बोऱ्हाडेमळा व लोंढेमळा येथे आजार व अचानक मृत्यूचे प्रमाण वाढले असून गेले पाच दिवसापूर्वी लोंढेमळा येथिल ९ वर्षाची इयत्ता ४ थी मध्ये शिकणारी मुलगी कुः स्वरांजली निलेश लोंढे या मुलीला स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम चालू असताना रक्ताच्या उलट्या झाल्या. ब्लड कॅन्सरचे निदान झालेले असून टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे तिच्यावर सध्या उपचार चालु आहेत.
हे ओढया नाल्यांचे दुषित पाणी शिरूर मधून घोड नदीला मिळत असून ते चिंचणी जलाशयात जात असून चिंचणी जलाशयाचे पाणीही यामुळे दूषित झाले आहे. त्याचा फटका जलाशयाजवळील श्रीगोंदा ,पारनेर या तालुक्यांना बसला असून त्या दोन तालुक्यातील पाणी पूर्णपणे दूषित होऊ लागलेले आहे .याच जलाशयातून हे पाणी पुन्हा कारेगाव - रांजणगाव एमआयडीसी येत असून हे पाणी पिण्यासाठी वापरात येत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक आजार जडले असल्याचे परिसरातील नागरिक सांगत आहे .एकूणच या कंपनीच्या केमिकल युक्त पाण्यामुळे परिसरातील नागरिकांची वाट लागलेली असून आता या सर्व गावातील नागरिकांनी एकत्र येऊन या कंपनी विरोधात एल्गार पुकारला असून येत्या २८ऑगस्ट रोजी ते पुणे -नगर हायवे अडूवून रस्ता रोको आंदोलन करणार आहे.
.