समाजातील विकृत विचारसारणी दूर करा - नितीनभाऊ मोरेशिक्रापुरात ऐतिहासिक सरस्वती पूजन व विद्यारंभ सोहळा

9 Star News
0


शिरूर 
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथे दिंडोरीप्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र आदरणीय  नितीनभाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सरस्वती माता सामूहिक पूजन व विद्यारंभ सोहळा उत्साहात संपन्न झाला असून यावेळी बोलताना समाजातील विकृत विचारसारणी दूर करण्यासाठी मुल्यसंस्कारासोबत आता स्वसंरक्षण अभियान तळागाळात पोहचवा असे सांगत छत्रपती शिवरायांचा विशेष उल्लेख करताना आज पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचे विचार जपणारी पिढी घरा घरातुन घडण्यासाठी मूल्यसंस्काराचे कार्य बळकट करावे असे आवाहन नितीनभाऊ मोरे यांनी केले आहे.
                               शिक्रापूर ता. शिरुर येथेदिंडोरीप्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र आदरणीय श्री नितीनभाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सरस्वती माता सामूहिक पूजन व विद्यारंभ सोहळा प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य कुसूम मांढरे, जिजामाता बँकेचे संचालक आबाराजे मांढरे, पंचायत समितीच्या माजी सभापती मोनिका हरगुडे, सरपंच रमेश गडदे, उपसरपंच सारीका सासवडे, ग्रामपंचायत सदस्य वंदना भुजबळ, त्रिनयन कळमकर, माजी सरपंच जयश्री भुजबळ, अमर करंजे यांसह आदी पदाधिकारी, ग्रामस्थ, सेवेकरी, शिक्षक यांसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भारतीय संस्कृतीमध्ये विद्येची व बुद्धीची देवता म्हणून श्री सरस्वती मातेस प्रथम स्थान दिले आहे. या सामूहिक सरस्वती पूजन सोहळ्यातून मुलांमध्ये भक्ती व मूल्यसंस्काराची शिकवण रुजवण्याचा विधायक हेतू या उपक्रमातून साध्य करण्यात आला, यावेळी शालेय मुले, युवा, युवती आणि पालक एकत्रितपणे सामुहिक पद्धतीने सरस्वती मातेचे पूजन केले. यावेळी पालक आणि पाल्य यांच्या एकत्रित सहभागातून संपन्न झालेल्या या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व सेवेकरी बंधू भगिनींना आदरणीय गुरुपुत्र श्री नितीन भाऊ यांनी हितगूजातून मूल्यसंस्काराचे महत्त्व विशद करताना सद्यस्थितीत समाजातील अप्रिय घटना टाळण्यासाठी सुसंस्कारासोबतच स्वसंरक्षण तंत्रही अवगत करावे लागेल असे नमूद केले.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर येथे ऐतिहासिक सरस्वती पूजन व विद्यारंभ सोहळ्यास झालेली गर्दी.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!