रामलिंग महाराज की जय..... जय घोषात चौथ्या श्रावणी सोमवारी निमित्त श्री रामलिंग महाराज दर्शनासाठी मोठी रांग हजारो रामलिंग भक्तांनी लावली होती तर शिरूर येथील रामलिंग भक्तांनी सातशे किलो खिचडीचे वाटप दर्शनासाठी आलेल्या रामलिंग भक्तांना केले.
पवित्र श्रावणी महिन्याचा चौथा सोमवार त्यात आज कालाष्टमी असल्याने मोठ्या प्रमाणात महिलांनी रामलिंगांचे दर्शन घेतले
शिरूर येथील रामलिंग भक्त उद्योजक रत्नाकर कोळपकर, महेश रासने, सामाजिक कार्यकर्ते अजित डोंगरे यांच्यावतिने आज श्रावणी सोमवारी अनेक भाविकांना उपवास असल्याने पहाटे पासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत येणाऱ्या प्रत्येक भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले.
त्यांच्या या समाज उपयोगी कामाची श्री रामलिंग देवस्थान ट्रस्ट वतीने कौतुक केले आहे.
श्रावणी सोमवारी निमित्त मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.
पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात भावीक श्री रामलिंग दर्शनासाठी येत होती आज सकाळची आरती आरती मंडळाच्या वतीने घेण्यात आली. मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी असलेली भक्तांची रांग त्यासाठी शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले होते.
तर श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टच्या वतीनेयावेळी रामलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाशभाऊ धारिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर सजवण्यात आले होते. ट्रस्ट चे खजिनदार पोपटराव दसगुडे,गोदाजी घावटे, रावसाहेब घावटे , बलदेवसिंग परदेशी,जगन्नाथ पाचर्णे , बबनराव कर्डीले, नामदेव घावटे, दर्शन व भक्तांना कुठली गैरसोय होऊ नये म्हणून लक्ष ठेऊन होते.