राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचे सांगून, मी सात ते आठ वेळा निवडणूक लढवल्याचे सांगितले आहे अशी प्रतिक्रिया देताना बारामती विधानसभा मधून जय पवार यांच्या नावाच्या चर्चेला ऊत आला असला तरी शिरूर विधानसभा मतदार संघातील इच्छुकांच्या मात्र दादांच्या या घोषणेमुळे धडकी भरली असून, त्यांच्या दिवसा बत्या लागल्या आहेत.
काही महिन्यांपासून शिरूर विधानसभा मतदारसंघांमधून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार इच्छुक असल्याचे व येथून लढतील अशा चर्चेने जोर धरला होता.
त्यात आजच अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना विधानसभा निवडणुकीसाठी रस नअसल्याचे सांगितले आहे. त्याबरोबर बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांचे चिरंजीव जय पवार यांच्या उमेदवारीने बारामती मध्ये जोर धरला आहे. त्यात दादा नवीन मतदार संघाच्या शोधातही असल्याची चर्चा आहे.
दादा बारामतीतून लढणार नाही इच्छुकही नाही परंतु जय पवार बारामतीतून उमेदवार असतील अशी चर्चा सुरू आहे. परंतु दादांची नजर स्वतःच्या उमेदवारीसाठी शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात तर नाही ना ? अशी धडकी शिरूर विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांमध्ये भरली आहे असे म्हणने वावगे ठरणार नाही.
त्यात अजित पवार नवीन मतदार संघाची ही चाचपणी करीत असल्याच्या चर्चा असून ,अजित पवारांची वक्रदृष्टी शिरूर विधानसभा मतदारसंघावर पडली तर शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये असणारे अनेक इच्छुक आज गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत. अनेकांनी मोठ्या दिमाखत निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शिरूर हवेली ती मतदारांच्या गाठीभेटी विविध प्रलोभणे देण्याचे काम सुरू आहे.
गावागावात जाऊन या विधानसभेच्या इच्छुकांनी प्रमुख नेत्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन मोठ बांधण्याचे काम सुरू केले आहे.
परंतु राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केलेली घोषणा त्यात बारामती त्यांचे चिरंजीव उभे राहिले तर दादा नवीन मतदार संघाच्या चाचपणीत असल्याचे चर्चा या सर्वांमुळे जर दादांची वक्रदृष्टी शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघावर पडली तर मात्र या विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुक असणाऱ्यांचे मनसुबे उधळले जातील.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आजची घोषणा मात्र शिरूर हवेली विधानसभा मतदार संघातील इच्छुकांच्या काळजात धडकी भरवणारी नक्कीच आहे.
जोपर्यंत दादा आपला निर्णय जाहीर करत नाही तोपर्यंत मात्र या सर्व शिरूर विधानसभा तील इच्छुकांची मात्र झोप उडाली आहे हे म्हणणे वावगे ठरणार नाही.
