शिरूर दिनांक १६ प्रतिनीधी
जनहित सोशल फाउंडेशन च्या वतीने स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी जनहित कट्टाहा उपक्रम अस्तित्वात आणून यातून मोबाईल उपवास ही नवीन संकल्पना अस्तित्वात आणली असून, ही संकल्पना समाजासाठी व मित्रांसाठी प्रेरणादायी ठरेल.
काल १५ अॅागस्ट रोजी पहिला ‘जनहित कट्टा’जनहित सोशल फाऊंडेशन कार्यालय,संभाजीनगर ,कदमवाकवस्ती ,लोणी काळभोर येथे संपन्न झाला.जनहित सोशल फाऊंडेशन च्या सदस्यांचा चांगला प्रतिसाद या नाविन्यपुर्ण उपक्रमास लाभला.
उपस्थितांनी खुप चांगले विषय चर्चेसाठी घेतले व त्यावर विस्तृत अशी चर्चा झाली.
स्वातंत्र्यदिन असल्याने अर्थातच देशाचा स्वातंत्र्याचा इतिहास,देशाची फाळणी अशा विषयांवर चर्चा करून अनेक माहिती नसलेले विषय समजले.गंभीर चर्चा,हास्यविनोद,चेष्टा अशात दोन तास कसे संपले हे समजले देखील नाही.
या दोन तासांसाठी सर्वांनी आपआपले मोबाईल फोन बंद ठेवले होते.यातून ‘मोबाईल उपवास’ हि नविन संकल्पना समोर आली.सर्वांनी कट्ट्यावर आल्यावर महिन्यातून दोन तास मोबाईल उपवास पाळायचं ठरवले.
जनहित सोशल फाउंडेशन च्या वतीने जनहित कट्टा हा उपक्रम राबवला असून, यातून समाजाला उपयोग होईल असे नवनवीन उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्याचा उपयोग समाजाला नक्की होईल. या बैठकीत मोबाईल उपवास ही संकल्पना सुरू होऊन मित्रांमध्ये बसल्यावर मोबाईल बंद झाल्याने चर्चा अधिक होईल व त्यामुळे मैत्री अधिक दृढ होईल होण्यास मदत होणार आहे.
प्रवीण काळभोर ,अध्यक्ष ,जनहित सोशल फाउंडेशन
