लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व पुतळा या मागणी साठी १८ ऑगस्ट पासून अमरण उपोषण - दादाभाऊ लोखंडे

9 Star News
0
शिरूर, दिनांक प्रतिनीधी 
     शिरूर शहरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक व पुतळा बसवावा यासह विविध  मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हा कोर कमिटीचे अध्यक्ष दादाभाऊ एकनाथ लोखंडे हे १८ ऑगस्ट पासून शिरूर नगर परिषद कार्यालयाबाहेर अमरण उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
       याबाबतचे निवेदन तहसीलदार शिरूर, गटविकास अधिकारी शिरूर पंचायत समिती, शिरूर नगर परिषद मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक शिरूर यांना देण्यात आले आहे.
       शिरूर शहरासारख्या सर्व धर्म समभाव व जातीय सलोखा जपणाऱ्या शहरात साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे असे व्यक्तिमत्व की ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्वाचे योगदान दिले. महाराष्ट्राला त्यांच्या रूपाने एक अजरामर लेखक, कवि, कथा, कांदबरीकार मिळाला. अशा थोर महापुरूषाचे यथोचित स्मारक व पुतळा शिरूर शहर सारख्या ठिकाणी नाही ही खुप मोठी खंत समस्त शिरूर शहरातील व तालुक्यातील मातंग समाजाच्या प्रत्येक बंधू भगिनी, जेष्ठ महिला युवकाला असून,तालुक्यात ३५ ते ४० हजार लोकसंख्या असलेल्या समाजाला तालुक्याच्या ठिकाणी आल्यानंतर विचार विनिमय व बैठकीसाठी तसेच जयंती उत्सवासाठी ठोस असे ठिकाण नाही. वर्षानुवर्षे समाजातील संघटनांच्यावतीने तसेच समाजाच्यावतीने अनेकवेळा निवेदने, मोर्चे, आंदोलने करण्यात आले. परंतू आजतागायत नगरपालिका शासन कर्त्यांनी त्या निवेदनाला केराची टोपली दाखविली व कुठलीही दखल घेतली नाही. किती दिवस समाजाने गप्प बसायचे ? सर्व आश्वासने हवेत विरली परंतू कोणीही आमच्या मागणीचा विचार केला नाही.
        १८ ऑगस्ट २०२४ रोजी शिरूर नगरपरिषद नवीन इमारत या ठिकाणी दादाभाऊ एकनाथ लोखंडे मातंग समाजाचा प्रतिनिधी म्हणून साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे शिरूर शहरात योग्य त्या जागेवर आरक्षण टाकून उचित स्मारकासाठी जागा आरक्षित करून सदर ठिकाणी शिरूर नगरपालिकेच्या वतीने लोकशाहीराला व शिरूर शहराला साजेसे स्मारक व पुतळा व्हावे यासाठी आमरण उपोषण करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

मागण्या शिरूर शहरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे पुतळा व स्मारक व्हावे.
 शिरूर शहरातील सर्व झोपडपट्टी धारकांचे पुर्नवसन करून आहे त्याच ठिकाणी झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्प राबवूण त्यांना हक्काची घरे मिळावी.
 शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावात मातंग समाजाच्या वस्तीत समाज मंदीर करण्यात यावे.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!