हवेली तालुक्यातील कदम वाक वस्तीवरील सर्वच भागातील विकास कामासाठी लागेल तेवढा निधी शासनाच्या मार्फत उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रवीण काळभोर यांनी केले.
जणू दे खाना पुणे जिल्हा नियोजन समिती निधीतून कदम वाकवस्ती गावातील वार्ड क्रमांक तीन येथील कुंजीरवस्ती व खैरेवस्ती येथील दहा लक्ष रुपयाचे काँक्रीट रस्त्याचे कामाचे अंतर्गत गटार लाईन दहा लक्ष कामाचे भूमिपूजन प्रवीण काळभोर यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य गौरव काळभोर, दीपक आढाळे, अण्णा पवार ,आप्पा कदम, संजय खैरे, राहुल खैरे ,अमोल काळभोर व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते,
यावेळी स्थानिक नागरिकांनी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रवीण काळभोर यांनी या भागात रस्ता व अंतर्गत गटार लाईनचे काम सुरू केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.