शिरूर
( प्रतिनिधी ) गावामध्ये कोणतीही विकासकामे होत असताना विकासकामे चांगली व दर्जेदार होण्यासाठी प्रत्येकाने विकासकामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत माजी सभापती सुभाष उमाप यांनी व्यक्त केले.
जातेगाव बुद्रुक ता. शिरुर येथे ग्रामपंचायत निधीतून करण्यात येणाऱ्या समाजमंदिर सुधारणा कामाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना माजी सभापती सुभाष उमाप बोलत होते, याप्रसंगी सरपंच निलेश उमाप, ग्रामविकास अधिकारी चेतन वाव्हळ, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पटेकर, उद्योजक अभिजित लंघे, शांताराम पटेकर, नवनाथ इंगवले, दिगंबर पटेकर, बाबुराव इंगवले, अनिल होळकर, दिलीप होळकर, नरेश पटेकर, संतोष जाधव, शरद उमाप, प्रल्हाद पटेकर यांसह आदी उपस्थित होते, तर यावेळी बोलताना गावातील अन्य विकास कामांबाबत वरिष्ठ कार्यालयात पाठपुरावा करुन उर्वरित विकासकामे केली जाणार असल्याचे सरपंच निलेश उमाप यांनी सांगितले. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पटेकर यांनी सर्वांचे आभार मानले.
फोटो खालील ओळ – जातेगाव बुद्रुक ता. शिरुर येथे समाजमंदिर सुधारणा कामाचे भूमिपूजन करताना मान्यवर.