शिरूर
( प्रतिनिधी ) शिंगाडवाडी ता. शिरूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शाळेच्या मैदानात एक मूल दोन झाडे हा उपक्रम राबवण्यात आलेला असताना रक्षाबंधनच्या निमित्ताने मुलींनी शाळेतील वृक्षांचे पूजन करत वृक्षांना राख्या बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे केले आहे.
शिंगाडवाडी ता. शिरूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक अशोक पवार व सूर्यकांत बढे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत वेगवेगळ्या झाडांची परसबाग तयार केली असून त्यामध्ये रोजच्या पोषण आहारासाठी मिरची, टोमॅटो, वांगी, भोपळा, कोथंबीर, कढीपत्ता यांसह आदी रोपांसह देशी झाडांची लागवड केली आहे. तर नुकतेच रक्षाबंधन साजरे होत असताना मुलींनी वृक्षांचे पूजन करत वृक्षांना राख्या बांधून आपण लावलेल्या झाडाचे रक्षण व संवर्धन करण्याची शपथ घेतली आहे. शाळेमध्ये मुलांनी केलेल्या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल चोरामले, उपाध्यक्ष सुरेश गोरड यांनी कौतुक करत सर्व मुलांना स्पोर्ट्स ड्रेस भेट देऔन कौतुक केले आगे.
फोटो खालील ओळ – शिंगाडवाडी ता. शिरूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षांना राख्या बांधताना मुली.