मुंबई येथील ई डी कस्टडीत असणारे मंगलदास बांदल यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत असून आज त्यांची पत्नी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्या रेखाताई व बंधू प्रताप बांदल यांना ई डी कार्यालयाने चौकशीसाठी बोलवले आहे.
मुंबई येथे काल पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांना अटक करण्यात आली होती त्यांना ई डी कोर्टात हजर केले असता 29 ऑगस्ट पर्यंत ईडी कष्ट मिळाली आहे.
त्यात त्यांचे बंधू प्रताप व पत्नी रेखाताई यांना आज सकाळी 11 वाजता हाजीरहो चे आदेश दिल्याने ते आज मुंबईकडे रवाना झाले असल्याचे समजते.
शिरूर विधानसभा मतदारसंघातील हवेली शिरूर तालुका मधील एक एक नावाजलेला नेता म्हणून जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती मंगलदास बांदल यांची ख्याती आहे.
परंतु शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर या अगोदरही गुन्हा दाखल होतो आता पुन्हा त्यांना ईडीने ताब्यात घेतल्याने शिरूर तालुक्यातील व हवेली तालुक्यात खळबळ उडाली आहे.
विविध स्वरूपाचे गुन्हे
सराफ व्यावसायिकाला धमकाविल्याप्रकरणी मंगलदास बांदल यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी 'मोक्का'नुसार कारवाई केली होती. पुणे जिल्हा बँकेच्या फसवणूक प्रकरणात बांदल जवळपास दोन वर्षे तुरुंगात होते. फसवणूक, खंडणीसह विविध प्रकरणांत त्यांच्या नावावर गुन्हे आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा राजकारणात सक्रिय होण्यासाठी विविध राजकीय पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत बांदल यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळविली होती. मात्र, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेऊन पक्षाने पुन्हा त्यांची उमेदवारी रद्द केली होती. सध्या ते शिरूर मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यात त्यांच्यावर ई डी कार्यवाही हे षडयंत्र असल्याचे बोलले जात आहे.
मंग यामागे कोण असा सवालही उपस्थित होत आहे.