शिरूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याची कामधेनू असणारा घोडगंगा सहकारी साखर कारखाना यंदा सुरू होईल अशी आशा सर्वांनाच होती परंतु राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोप यांच्यामुळे कारखान्याकडे लक्ष देण्यास वेळच कोणाला म्हणून यंदाचे गाळाप होणार नाही. त्यामुळे कायम स्वरुपी कारखाना बंद होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे दिसून येत असून ,यामुळे तालुक्यातील सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांची मानसिकता हरवली असल्याची दिसून येत आहे.
शिरूर तालुक्यातील २० हजारहून ऊस उत्पादक शेतकरी सभासद मोठ्या प्रमाणात असलेले कर्मचारी यांना याचा मोठा फटका बसणार आहे यांना याचा मोठा फटका बसणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे पोट या घोडगंगा साखर कारखान्याच्या नोकरीवर होते त्यांना आता जगणे मुश्किल झाले असणार आहे.
कारखाना सुरू होण्याअगोदर ऊस तोडणी टोळी ठरविणे, कारखान्याची मरंमत करणे, लागणाऱ्या वस्तूंची निविदा काढने... यासारखी कामे असतात परंतु ही सर्व कामे ठप्प कारखाना होतो गप्प.
शिरूर तालुक्यातील कामधेनु स्वर्गीय रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली होती याचा फायदा तालुक्यातील शेतकरी वर्गाला होईल असे त्यांची स्वप्न होते .
परंतु मागील 2023 /24 चे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची गाळप निधी अभावी बंद असल्याची चर्चा होती. यावर विरोधक आमदार अशोक पवार यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे कारखाना बंद पडला असून या परिस्थितीला आमदार अशोक पवार जबाबदार असल्याचे सांगून हात झटकून टाकत आहे.
परंतु राज्यातील सत्तेत असणारे महायुतीचे तालुक्यातील नेते कार्यकर्ते यांनी हा कारखाना माझा आहे असे समजून आपल्या नेत्यांकडून निधी आणणे गरजेचे होते. वेळ पडली तर कारखान्यावर प्रशासकाची नेमणूक करायला हवी होती परंतु कारखाना सुरू करण्यासाठी लागणारा निधी हा कारखाना आपला म्हणून आपल्या प्रपंचाचा एक भाग म्हणून उपलब्ध करण्यासाठी आपल्या नेत्यांची मंत्र्यांची उंबरठा झिजवणे गरजेचे होते. परंतु त्यांच्याकडूनही काही झाले नाही.
कारखान्याच्या सत्तेत असणारे नेते आणि विरोधक केवळ एकमेकावर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. हा कारखाना कायमस्वरूपी बंद व्हावा हे यांचे दोघांचे राजकारण तर नाही ना असे वाटू लागले आहे.
घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद होतोय... दुसरा गळीप हंगाम बंद होतोय... परंतु तेरी भी चुप मेरी भी चूप.... काहो कोणासाठी.... नेत्यांनो सांगा सांगा..... आता कारखाना तुम्हाला का नकोसा झाला आहे. ... सांगा सांगा.... भ्रष्टाचाराचे कुरन म्हणून तुम्ही त्याला कायम पाहात राहिला आता तो सुरू करण्यासाठी प्रयत्न का करत नाही सांगा सांगा.... भ्रष्ट नेत्यांनो सांगा सांगा.... खोटारड्या नेत्यांनो सांगा सांगा...