शिरूर
( प्रतिनिधी ) महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीण व अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था शिरूर यांच्या वतीने नुकतेच शिरूर तालुक्यातील साहित्यिकांचा सन्मान व तालुक्यातील बालकवींसाठी आयोजित केलेल्या तालुकास्तरीय काव्य स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीण व अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था शिरूर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध गीतकार व कवी हनुमंत चांदगुडे हे होते तर यावेळी उत्तमराव भोंडवे , गुलाबराव गवळे, तुकाराम बेनके, मारुती कदम, मयूर करंजे, जेष्ठ साहित्यिक दादाभाऊ गावडे, अनिल पलांडे, संजय धुमाळ, प्राचार्य संजीव मांढरे, अशोक दहिफळे, प्रवीणकुमार जगताप, नागनाथ शिंगाडे, शेखर फराटे, राहुल चातुर, विवेकानंद फंड, सुरज दरेकर, संभाजी चौधरी, स्वप्नील महाजन, आकाश भोरडे, शरद रणदिवे, विठ्ठल वळसे उपस्थित होते, यावेळी कवी पांडुरंग बाणखिले, आकाश भोरडे, नानासाहेब गावडे, गिरीश खराबे यांनी देखील सामाजिक विषयांवर कविता सादर केल्या. तर हनुमंत चांदगुडे यांनी कवी हा दुःख, हाल आणि वेदना सहन केल्यावर निर्माण होतो असे मत व्यक्त केले. याप्रसंगी मिनल साकोरे, राहुल शिंदे,गिरीश खराबे, विजय वनवे, संतोष फंड, सिद्धी फराटे, अनन्या चातुर, तानाजी धरणे, डॉ. मिलिंद भोसुरे, कोमल गायकवाड, मीना म्हसे, डॉ. पांडुरंग बाणखेले, तेजस्विनी रुके, साक्षी भंडारे, पायल सोनवणे यांसह विशेष शाळा सहभाग सन्मान वाघेश्वर विद्याधाम मांडवगण फराटा यांना साहित्य गौरव पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले, तर मामाच्या मळ्यात लेखक सचिन बेंडभर पाटील, पारावरच्या गोष्टी लेखक शेखर फराटे पाटील, लग्नाचा बार लेखक प्रा. कुंडलिक कदम, नक्षत्रांचे कवडसे लेखक नानासाहेब गावडे, क्रांतिभूमी लेखक विठ्ठल वळसे पाटील यांना पुस्तक गौरव पुरस्कारने सन्मानित करण्यात आले, यावेळी सर्व पाहुण्यांचे स्वागत मसापचे अध्यक्ष मनोहर परदेशी यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बेंडभर यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. कुंडलिक कदम यांनी केले आणि प्रा. गुरुनाथ पाटील यांनी आभार मानले.
फोटो खालील ओळ - शिरूर तालुक्यातील गौरविण्यात आलेले साहित्यिक व लेखक.
