शिरूर
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील यश नर्सिंग होम हॉस्पिटलचे संचालक डॉ. चंद्रकांत केदारी यांना नुकतेच थोर विचारवंत प्रा. हरी नरके सर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले विचार मंचाच्या वतीने दिला जाणारा सत्यशोधक डॉ. हरी नरके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील यश नर्सिंग होम हॉस्पिटलचे संचालक डॉ. चंद्रकांत केदारी यांनी वैद्यकीय सेवेतून नागरिकांची सेवा केलेली असताना सामाजिक भान राखून अनेक अनाथ आश्रम, गरजू मुलांसाठी वैद्यकीय तपासणी तसेच उपचार यांसारखे उपक्रम राबवत अनेक गरजू शालेय मुलांना वही वाटप यांसारखे उपक्रम राबवले आहेत, त्यांच्या कार्याची दखल घेत डॉ. चंद्रकांत केदारी यांना थोर विचारवंत प्रा. हरी नरके सर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले विचार मंचाच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत व प्रबोधनकार डॉ. रफिक सय्यद, फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रचारक ॲड. संभाजीराव बोरुडे यांच्या हस्ते सपत्नीक सत्यशोधक डॉ. हरी नरके पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, दरम्यान याबाबत बोलताना आम्हाला मिळालेल्या पुरस्काराने आम्ही भारावून गेलो असून आता आमची सामाजिक जबाबदारी वाढली असल्यामुळे यापुढे सत्यशोधक पद्धतीने काम करून या पुरस्काराला न्याय देण्याचे प्रयत्न करणार असल्याचे मत डॉ. चंद्रकांत केदारी यांनी व्यक्त केले, तर प्रबोधनकार डॉ. रफिक सय्यद यांनी आपल्या भाषणात मानवताधर्म, स्रीभ्रूण हत्या, शिक्षण व नीती इत्यादींविषयी आजचे वास्तव विषद केले, तसेच ॲड. संभाजीराव बोरुडे यांनी समता, कायदा व वैज्ञानिक दृष्टिकोन पटवून देत बहुजन समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, कर्मकांड यावर रोखठोक भाष्य केले, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य ॲड. सुरेश भुजबळ यांनी केले तर प्रास्ताविक लक्ष्मण नरके यांनी केले आणि माजी सैनिक पोपटराव भुजबळ यांनी सर्वांचे आभार मानले.
फोटो खालील ओळ - शिक्रापूर ता. शिरुर येथील डॉ. केदारी यांना पुरस्काराने सन्मानित करताना पदाधिकारी.
