शिरूर
( प्रतिनिधी ) वरुडे ता. शिरुर येथे कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन संस्थेच्या वतीने अंतर्गत गावामध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी ग्रंथालयचे उद्घाटन करण्यात आले आहे.
वरुडे ता. शिरुर येथे कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन संस्थेच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांच्या ग्रंथालयचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळेचे शिक्षक यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते, दरम्यान गावातील बाल चमुंचा चांगला प्रतिसाद मिळाला, यावेळी विद्यार्थी व ग्रामस्थ्यांना विविध पुस्तकासंदर्भात माहिती देण्यात आली, तर कैलास सत्यार्थीचे उपक्रम अशाच पद्धतीने गावामध्ये रबवावे अशी अपेक्षा ग्रामस्थ्यांनी व्यक्त केली, मुलांना वाचनाची गोडी लावावी त्यासाठी संस्था सतत काम करत राहील असे कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशनचे मयूरा दळवी, वैभव घाटे यांनी सांगितले, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव घाटे यांनी केले तर मयुरा दळवी यांनी आभार मानले.
फोटो खालील ओळ - वरुडेत ग्रंथालयचे उदघाट्न करताना पदाधिकारी व विद्यार्थी.
