शिरूर नगर परिषदेने फ्लेक्स बोर्ड बंदी उठवली ? राज्यातील सत्ताधार्यांपुढे नगरपरिषदेचे साष्टांग लोटांगण

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
      शिरूर शहरात शिरूर नगर परिषदेच्या वतीने फ्लेक्स बंदी उठवली? त्यामुळे शिरूर शहरात मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावले आहेत. जर त्याच्यावर बंदी असेल तर हे फ्लेक्स काढणे गरजेचे आहे परंतु शिरूर नगरपरिषद राजकीय राज्यातील सत्ताधारी पुढार्‍यांच्या पुढे लोटांगण घेत असल्याचे चित्र दिसत असून शिरूर शहरातील फ्लेक्स बंदी उठली ?
            शिरूर शहरात नगर परिषदेच्या वतीने फ्लेक्स बंदी केली आहे. हे खरे आहे का? असेच म्हणावे लागेल. कारण गेल्या काही दिवसांपासून शिरूर शहरात सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात फ्लेक्स बाजी दिसून येत आहे. याबाबत आवाज उठवण्यात नागरिक होताना दिसत आहे. 
         परंतु शिरूर नगर परिषदेने या फ्लेक्स बाजीकडे सपशेल दुर्लक्ष केल्याची दिसून येत आहे. सर्वसामान्य नागरिकांनी किंवा इतर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे नेत्यांची फ्लेक्स काढण्यासाठी पुढे असणारे कर्मचारी आज मागे का? असा सवाल उपस्थित होत असून, यापुढील काळात शिरूर शहरातील नागरिकांनी किंवा तरुणांनी वाढदिवसाचे किंवा इतर कार्यक्रमाचे फ्लेक्स बोर्ड लावले तर शिरूर नगर परिषदेस चालेल का?
          या अगोदर मोठ्या प्रमाणात शिरूर नगर परिषद फ्लेक्स बोर्डवर कारवाई करत होती परंतु सध्या शहरात एका राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचे वाढदिवसाचे फ्लेक्स बोर्ड शिरूर शहरात लावून शहर विद्रूपीकरण करण्याचे काम केले आहे. यावर मात्र नगरपरिषद मुख्याधिकारी गप्प का ?
            जे कर्मचारी फ्लेक्स बोर्ड लावल्यानंतर कुठली सूचना न देता लावलेले फ्लेक्स बोर्ड मोठ्या दिमाखात ट्रॅक्टर मध्ये घेऊन जाताना आम्ही पाहिले आहे. ती कारवाई पाहून शिरूर नगरपरिषद सर्वांना न्याय सारखा देते असे वाटत होते. 
            परंतु सत्ते पुढे शहाणपण नको अशी परिस्थिती शिरूर नगरपरिषदेची झाली असून शिरूर नगर परिषद प्रशासन मात्र या राज्यातील सत्ताधारी नेत्याच्या फक बाबत मात्र गप्प असून साष्टांग लोटांगण घालत असल्याचे दिसून येत आहे.   
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!