शिरूरचे जागृत देवस्थान श्री रामलिंग च्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांची रांग तर प्रभू शंकराच्या रांगोळीने भक्तांचे लक्ष वेधले

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
       शिरूर येथील जागृत देवस्थान श्री रामलिंग च्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांनी रांग लावली होती रामलिंग महाराज की जय... जयघोष सुरू तर परिसराला यात्रेचे स्वरूप आले प्रवेश दारावर प्रभू शंकराची सुरेख काढलेली रांगोळी भक्तांचे लक्ष वेधून घेत होती.
     पवित्र श्रावण मासाचा दुसरा सोमवार असल्याने रामलिंगाच्या दर्शनासाठी शिरूर तालुका पंचक्रोशी व इतर गावाहून नागरकांनीगर्दी केली होती.
        यावेळी रामलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाशभाऊ धारिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर सजवण्यात आले होते. ट्रस्ट चे खजिनदार पोपटराव दसगुडे,गोदाजी घावटे, रावसाहेब घावटे , बलदेव सिंग परदेशी,जगन्नाथ पाचर्णे , बबनराव कर्डीले, नामदेव घावटे, दर्शन व भक्तांना कुठली गैरसोय होऊ नये म्हणून लक्ष ठेऊन होते.
       रामलिंग येथिल मंदिराच्या प्रवेशद्वारावर राणीताई बनकर यांनी काढलेलीअतिशय सुरेख रांगोळी आलेल्या रामलिंग भक्तांचे लक्ष वेधून घेत होते. ही रांगोळी काढण्यासाठी त्यांना पाच तासाचा कालावधी लागला आहे. अशी प्रभू शंकराची रांगोळी काढायची त्यांची इच्छा होती देवस्थान ट्रस्टने त्यांना ही रांगोळी काढण्याची परवानगी दिली आणि अतिशय सुंदर आणि सुरेख रांगोळी त्यांनी काढली.
        मंदिरा बाहेर विविध खेळण्याची दुकाने, ज्वेलरी दुकाने, उसाचे गुऱ्हाळ, मिठाई, पेढे वाले, बेल फुल विक्री करणारे, तर कपाळी देवांचे गंध लावणारे यांच्या मूळ वातावरण भक्तिमय झाले.
       श्रावणी सोमवार असल्याने आलेल्या रामलिंग भक्तांना उपवास असल्याने या ठिकाणी खिचडी वाटप केळी वाटप करण्यात आले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!