न्हावराफाटा शिरूर कानिफनाथ मंदिर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून महिलेची ओळख पटलेली नाही.
एका अनोळखी महीला (वय अंदाजे 30 वर्षे ) या अपघातात मरण पावली आहे.
सौरभ संतोश महाजन (वय 21 वर्षे व्यवसाय अँम्ब्युलस चालक रा. महाजनमळा, शिरूर ता. शिरूर जि. पुणे) याने फिर्याद दिली आहे.
अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास सदरवाडी गावाजवळ न्हावराफाटा, कानिफनाथ मंदिर येथे कोणत्यातरी अज्ञात वाहणाने एका अनोळखी महीला वय अंदाजे ३० वर्षे हिस धडक देवुन निघुन गेला आहे. अज्ञात चालकाने स्वतःचे ताब्यातील वाहन बेदरकपणे हायगयीने अविचाराने भरधाव वेगात चालवून अपघात करून अपघाताची कोणतीही माहिती न देता निघून गेला आहे. म्हणून मा₹ त्या अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेचे अंगावर जांभळे रंगाचा कूर्त आणी पॅन्ट व हिरवे रंगाचा स्वेटर महिलेला घातलेला आहे. हातावर कीर्ती नाव गोंदलेले आहे. अज्ञात वाहनावर भारतीय न्याय संहिता कायदा कलम 281,125 (अ)(ब) 106(1)मो वा का क 184,134/177प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उबाळे करीत आहे.