धारदार शस्त्राच्या सहाय्याने डोकं, हात, पाय, धड कापून महिलेची निर्घृण हत्या करून तिचे धड खराडी येथील नदित फेकल्याचे निदर्शनास आले असून यामुळे पुणे शहरात खळबळ उडाली असून, या प्रकरणामुळे पुणे शहर हादरले आहे.
महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना काही थांबत नाही.
महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडली असले त्याची चित्र समोर येत आहे.पुण्यातील धक्कादायक प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, अनोळखी महिलेची हत्या करून तिच्या मृतदेहाचे अक्षरश: तुकडे करून पुण्यातील खराडी येथील नदीपात्रात फेकण्यात आले. नदीपात्रात काही संशयास्पद वस्तू नागरिकांना दिसल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तपास केल्यानंतर हा मृतदेह अल्पवयीन मुलीचा असल्याचे समजते. हत्या झालेल्या या तरुणीचे वय अंदाजे 30 वर्षाच्या पुढे असण्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खराडी परिसरात जेनी लाईट कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे. येथून जवळच असलेल्या नदीपात्रात हात, पाय आणि डोके नसलेल्या महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली याचा शोध घेतला. मृत तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. या तरुणांचे वय 18 ते 30 च्या आसपास आहे.
अज्ञात इसमाने मारून पुरावा नष्ट करण्यासाठी धारदार शस्त्राच्या सहाय्याने तरुणीचे धडापासून डोके, खांद्यापासून दोन्ही हात आणि दोन्ही पाय, धड ही कापले आहेत. त्यानंतर शरीराचे तुकडे नदीत फेकण्यात आले. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महिलांवरील अत्याचाराच्या भयानक घटना समोर येत आहेत.तरुणीपासून ते वृद्ध महिलांपर्यंत जे अत्याचार होत आहेत ते अत्यंत भयानक आहेत. कोलकाता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर बदलापूर येथील दोन चार वर्षीय चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार प्रकराने संपूर्ण देश हादरला आहे. असे असतानाही पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे