जांबुत येथील महिलेवर हल्ला करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी १५ पिंजरे लावण्यात आले असून, आज सकाळी यातील एका पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झालाय त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी नागरिकांनी समाधान व्यक्त केले असलेतरी या ठिकाणी आणखी बिबटे असून नर भक्षक बिबट्या हाच का याबाबत सांगणे कठीण आहे.
२६ ऑगस्ट रोजी जांबुतेची मुक्ताबाई खाडे या ५६ वर्षे महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात नागरिक महिला यांच्या वतीने वनविभागा विरोधात संताप प्रतिक्रिया दिली होती तर काल जांबुत या ठिकाणी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलनही केले होते.
महिलेच्या मृत्यूची माहिती मिळताच वन विभागाने या ठिकाणी वेगवेगळ्या भागात १५ पिंजरे बिबट्या पकडण्यासाठी लावले होते. त्यात सकाळी महिलेच्या घरापासून आठशे मीटर लांब अंतर असलेल्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला आहे. या बिबट्याचे वय अंदाजे तीन वर्षे असल्याचे वन विभागाने सांगितले आहे.
बिबट्या जेरबंद झाला असला तर या भागात मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या आहे ही संख्या आटोक्यात आणणे वनविभागा पुढेही आव्हान आहे. त्यामुळे पुढील काळात या भागात मनुष्यावर बिबट्याचे हल्ले होऊ शकतात.
वनविभागाकडून पिंजऱ्यात कैद झालेल्या बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात सोडण्यात आले आहे.माणिकडोह येथील डॉक्टरांनी सदर बिबटची तपासणी केली असून ती चार वर्षे वयाची मादी असल्याचे वनविभागाचे कर्मचारी महेंद्र दाते यांनी सांगितले.
-------------------------------------------------+++++------++----- शिरूर प्रतिनिधी. ----+--+++-----+-
शिरुर-तांदळी रस्त्यावर गुनाट निर्वी गावच्या शिवेजवळ पहाटे अज्ञात वाहनाच्या धडके बिबट्या जागी ठार झाला आहे. वाहना बाबत कुठलीही माहिती वन विभागाला मिळालेली नाही.
मंगळवार (दि २७) रोजी पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या जागीच ठार झाला असल्याचे सकाळी ग्रामस्थांना समजल्यानंतर ग्रामस्थांनी शिरुर वनविभागाला याबाबत माहिती दिली.
हा बिबटया गुनाट-निर्वी गावच्या शिवेजवळ फंड वस्तीनजीक मृत अवस्थेत असल्याचे नागरिकांना समजल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मृत बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. वन विभागाचे पथक या ठिकाणी येऊन त्यांनी पंचनामा करून मृत्यू बिबट्या ताब्यात घेतला.
गेल्या अनेक दिवसांपासुन या भागात बिबट्यांचा वावर वाढला आहे. शेतकऱ्यांची जनावरे तसेच पाळीव कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. विशेषत: बकऱ्यांना बिबट्याने लक्ष केले होते. त्यामुळे गुनाट परीसरात घबराट पसरली होती.
चार ते पाच वर्षाचे हा मादी बिबट्या असल्याचे वन विभागाने सांगितले त्याला शवविच्छेदनासाठी शिरूर येथे आणला होता त्यानंतर त्याच्यावर शासकीय नियमा नुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.
संतोष भुतेकर, वनपाल