पश्चिम बंगाल मधील कोलकत्ता (कलकत्ता) येथे डॉ. महिला व बदलापूर (महाराष्ट्र) मध्ये अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तसेच स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही महिला व सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी, न्यायासाठी उत्तम व्यवस्था उभी करण्यास अयशस्वी ठरलेल्या व्यवस्थेच्या, राज्यकर्त्याच्या आणि अशा गंभीर घटना गांभिर्याने न घेणाऱ्या दोषी पोलिसांच्या निषेधार्थ शिरूर चे सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज हे शुक्रवार दि २३ ऑगस्ट २०२४ रोजी शिरूर तहसील कार्यालया बाहेर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
यावेळी तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी सायंकाळीं उपोषण करते निलेश वाळूज यांना सरबत पाजून उपोषण सोडले.
या उपोषणास शिरूर तालुक्यातील अनेक राजकीय सामाजिक संघटना पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला.
सदरची घटना या अतिशय गंभीर स्वरुपाच्या असून देशातील विविध राज्यांमध्ये सातत्याने महिला, मुली व अल्पवयीन मुलींवरती अन्याय, अत्याचार होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. कदाचित असा एकही दिवस जात नाही की, अशा घटनांबाबतचे वृत्त प्रसारीत होत नाही. त्यामुळे महिला व नागरीकांच्या मनामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने व न्याय मिळण्याच्या दृष्टीने भिती निर्माण होत आहे.
सदर घडलेल्या घटना या मन हेलावुन टाकणाऱ्या व अतिशय गंभीर स्वरुपाच्या असुन व देशात या घडलेल्या पहिल्याच घटना नसून यापुर्वी देखील अशा स्वरुपाच्या घटना घडलेल्या आहेत, असे असताना देखील आपली सरकार या घटनांना पुर्णतः लगाम लावण्यासाठी अयशस्वी ठरल्याचे दिसत आहेत.
त्यामुळे विषयांकित घटनांबाबत अशी कृत्य करणा-या प्रवृत्तींवर कोणतीही दया न दाखवता कायदयामध्ये याबाबत कठोर शिक्षेबाबत तरतुदी करणे हे पुढील काळासाठी आवश्यक आहे व यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये असे अन्याय, अत्याचार करणाऱ्यांना ज्या पद्धतीची शिक्षा, शासन केले जात होते. त्यामुळे अशा प्रवृत्तींवर जरब बसत होता, अशा शिक्षेचा अवलंब करणे आता आवश्यक व गरजेचे झाले आहेत.
याबाबत सर्व सरकारांनी गांभिर्याने विचार करुन ठोस पावले उचलली पाहिजेत तसेच अशा घटनांमध्ये हलगर्जीपणा करणा-या व नागरिकांच्या न्यायिक हक्कांवर गदा आणणाऱ्या दोषी पोलिसांचे फक्त निलंबन न करता त्यांना कायमस्वरुपी बडतर्फ करण्यात येऊन फौजदारी कारवाई करण्यात यावी. यासाठी विषयांकित घटनांच्या निषेधार्थ शुक्रवार दि. २३ ऑगस्टरोजी तहसिल कार्यालय शिरूर येथे निलेश वाळुंज यांनी उपोषण केले.