शिरूर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर व महाराष्ट्रात महिलांच्या अत्याचारांच्या घटना वाढत असून भर पावसामध्ये शिरूर चे आमदार ॲड.अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारचा निषेधार्थ मूक आंदोलन करण्यात आले.
बदलापूर, कलकत्ता सह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडलेल्या महिला अत्याचारांच्या घटनांचा व असंवेदनशील सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शिरूर हवेली आमदार ॲड अशोकबापू पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतरत्न डॉक्टर आंबेडकर उद्यान येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून हे आंदोलन सुरू करण्यात आले.
तोंडाला , हाताला काळी पट्टी लावून ,काळे झेंडे, फलक झळकावून दाखवून महाराष्ट्र शासनाचा निषेध करत मुक आंदोलन करण्यात आले.
बहिणीला भिक्षा नको ,सुरक्षा हवी.. नाही तमा आम्हाला ऊन, पाऊस, वाऱ्याची... सावित्रीच्या लेकिंसाठी वज्रमूठ महाराष्ट्राची !
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवकचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल गायकवाड - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, युवकचे तालुका अध्यक्ष तुषार दसगुडे , काँग्रेस आय अल्पपसंख्याक तालुका अध्यक्ष अजिम सय्यद, माजी नगरसेवक मंगेश खांडरे,अमित शिर्के,राणी कर्डिले,गीता आढाव,संगीता शेवाळे,प्रियंका धोत्रे,शशिकला काळे, ॲड.रवींद्र खांडरे, ॲड.गौरव बाफना,सुरेश पाचर्णे, आपा वरपे,दीपक फलके,संग्राम वाघोले,संभाजी भुजबळ,आदित्य उबाळे,सागर नरवडे, अमोल करडे,युवराज सोनार,अक्षय सोनवणे,राहील शेख, दिपक फलके,ऋषभ मुथा,शीतल शर्मा,राणी शिंदे,बेबीताई शितोळे,दुर्गा ननवरे, प्रतीक्षा पवार,कल्पना चांदगुडे,ज्योती जगताप,कल्पना पुंडे, महिला उपस्थित होत्या.
शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने प्रभारी पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे,केंजळे यांनी शहरात कडक बंदोबस्त ठेवला होता.